Pimpri : महापौर राहूल जाधव यांनी केली बीआरटीएस मार्गाची पाहणी 

एमपीसी न्यूज – महापौर राहूल जाधव यांनी पिंपरी-चिंचवड शहरातील बीआरटीएस मार्गाचा पाहणी दौरा सुरु केला आहे. काळेवाडी येथील बीआरटीएस मार्गाची पाहणी केली. मार्गावरील समस्या जाणून घेत. त्या मार्गी लावण्याचे निर्देश बीआरटी विभागाच्या अधिका-यांना दिले आहेत.

यावेळी सहशहर अभियंता श्रीकांत सवणे, कार्यकारी अभियंता ज्ञानदेव जुंधारे ,  प्रमोद ओंबासे , उपअभियंता विजय भोजने, दिपक पाटील, संजय साळी यांच्यासह पीएमपीएलचे अधिकारी उपस्थित होते.

_MPC_DIR_MPU_II

बीरआरटीचे चारपैकी तीन मार्ग सुरु केले आहेत. चौथ्या मार्गासाठी पीएपीएलकडे बस देण्याची मागणी केली आहे. महापौर राहूल जाधव चिंचवड ऑटोक्लस्टर येथून यांनी पाहणी दौ-याला सुरुवात केली. काळेवाडी फाटा ते देहु-आळंदी रस्ता या बीआरटीएस मार्गावरील बस सेवा सुरु करण्यासाठी बसेसच्या उपलब्धतेबाबत त्यांनी चौकशी केली. पीएमपीएमएलच्या अधिका-यांना बस उपलब्ध करुन देण्याच्या सूचना त्यांनी केल्या आहेत.

तसेच या कॉरीडॉरवरील काळेवाडी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकाचा विकास आराखड्याप्रमाणे विकास करण्याच्या सूचना बीआरटीएस विभागाच्या अधिका-यांना दिल्या. बीआरटीएस कॉरीडॉरवर अनधिकृतपणे पार्किंग केलेल्या वाहने दिसून आली. त्या वाहनांवर तातडीने कारवाई करण्याचे निर्देश महापौर जाधव यांनी पोलिसांना दिले आहेत. तसेच चौकाचे नियमन करण्यास पोलिसांना सांगितले आहे, अशी माहिती उपअभियंता विजय भोजने यांनी दिली. आगामी काळात उर्वरीत बीआरटीएस मार्गाची पाहणी करणार असल्याचे महापौरांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.