Talegaon Dabhade : सह्याद्री इंग्लिश मीडीयम स्कूलच्या “भाज्यांची गंम्मत” या बालनाट्याला प्रथम पारितोषिक

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडेमधील सह्याद्री इंग्लिश मीडीयम स्कूलने कलापिनी आयोजित बालनाट्य स्पर्धेत भरगोस बक्षिसांची लूट केली. विविध विभागात उत्कृष्ट कामगिरी केलेल्या सह्याद्री शाळेला ‘भाज्यांची गम्मत’ या बालनाट्यासाठी प्रथम पारितोषिक मिळाले.

कलापिनी तर्फे डॉ शं वा परांजपे स्मृती आंतरशालेय बालनाट्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. विविध संघानी सहभाग घेतलेल्या या स्पर्धेमध्ये तळेगाव दाभाडेमधील सह्याद्री इंग्लिश मीडीयम स्कूलने बाजी मारली. त्यांनी सादर केलेल्या ‘भाज्यांची गम्मत’ या बालनाट्याला प्रथम पारितोषिक मिळाले तर सांघिक कामगिरीमध्ये फिरता करंडकला प्रथम पारितोषिक मिळाले.

दिग्दर्शनामध्ये कामिनी जोशी, लेखका कौमुदी जोशी यांना प्रथम पारितोषिक मिळाले तसेच रंगभूषा व वेषभूषेसाठी सविता जाधव तर श्रेया साळुंखे हिला ‘सोनू’ या भूमिकेसाठी अभिनयाचे प्रथम पारितोषिक देण्यात आले.

माध्यमिक गटात सादर झालेल्या ‘क्षणभर विसावा’ या नाटिकेला लक्षवेधी प्रयत्न म्हणून गौरवण्यात आले ह्या नाटिकेचे लेखन व दिग्दर्शन मेघना वीरकर यांनी केले होते. सर्व विजेत्यांचे शाळेच्या वतीने तसेच संस्थेचे संस्थापक गणेश भेगडे व अध्यक्ष सुनील भेगडे यांनी अभिनंदन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.