Lockdown: उद्या किराणा तसेच मांस विक्रीची दुकाने दिवसभर सुरु; इतर दिवसांसाठी चार तासांचे बंधन

Meat shops open all day tomorrow; Four-hour binding for other days

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात लागू असलेल्या लॉकडाउनमध्ये उद्यापासून शिथिलता येणार आहे.  शहरातील किराना दुकाने, मटन, चिकन, अंडी, मासे विक्रीची दुकाने रविवारी सकाळी आठ ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत दिवसभर खुली राहणार आहेत. त्यानंतर गुरुवार (दि. 23) पर्यंत सकाळी आठ ते दुपारी बारापर्यंत खुली राहणार आहेत.

याबाबतचा आदेश आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी आज (शनिवारी) काढला आहे.

शहरातील वाढती रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी, कोरोनाची साखळी तोडण्याकरिता सोमवारी (दि.13) मध्यरात्रीपासून दहा दिवस म्हणजेच 23 जुलैपर्यंत शहरात लॉकडाउन लागू करण्यात आला आहे.

पहिले पाच दिवस अत्यावश्यक सेवेसह सर्वच बंद ठेवण्यात आले. त्यानंतर थोडीशी शिथिलता देण्यात येणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले होते. त्यानुसार उद्यापासून शिथिलता असणार आहे.

अत्याश्यक वस्तुंचा पुरवठा करणारे दुकाने व त्यांचे ठोक विक्रेते यांची दुकाने उद्यापासून 23 जुलै पर्यंत सकाळी 8 ते दुपारी 12 वाजेपर्यंत  सुरु राहणार आहेत. इतर सर्व अस्थापना बंद राहतील.

शेतकरी आठवडा बाजार, भाजी व फळांची विक्री करणारे अधिकृत फेरीवाले यांच्यामार्फत करण्यात येणारी विक्री, याशिवाय मटन, चिकन, अंडी, मासे विक्रीची दुकाने सकाळी 8 ते 12 वाजेपर्यंत चालू राहणार आहेत.

लॉकडाउन  शिथील होताना दुकानांमध्ये, बाजारपेठेत होणा-या संभाव्य गर्दीचा विचार करता, कोरोनाचे संक्रमण टाळण्यासाठी उद्या रविवारी फक्त दिवसभर सगळी दुकाने उघडी राहणार आहेत.

सकाळी 8 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत खुली असतील. तर, 20 ते 23 जुलैपर्यंत  सकाळी 8 ते 12 वाजेपर्यंत चालू राहणार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.