Pimpri : पाळीव प्राण्यांसाठी सर्वरोग निदान

एमपीसी न्यूज – पेटस्‌ गॅलेक्‍सी प्राणी संस्थेच्या वतीने प्राण्यांची मोफत रेबीज लसीकरण व तपासणी शिबिराचे आयोजन केले असल्याची माहिती संचालक संजीव मुत्तूर यांनी दिली.

20 ऑक्‍टोबर रोजी सकाळी दहा ते सायंकाळी पाच या वेळेत भोसरीतील इंद्रायणीनगर येथील पेट गॅलेक्‍सीमध्ये शिबीर होईल. यावेळी पाळीव प्राणी तज्ज्ञ हे कुत्रा व मांजर संगोपन विषयक मार्गदर्शन करणार आहे. तसेच सर्व रोगनिदान शिबिरात प्राण्यांच्या त्वचेच्या रोगावर विशेष भर दिला जाणार असल्याचे संजीव मुत्तूर यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.