Pimpri : रेशनिंग दुकानदार, कामगारसह वितरण अधिकारी यांची वैद्यकीय चाचणी करा -गजानन बाबर

एमपीसी न्यूज – सर्वत्र कोरोनासारख्या साथीच्या आजारांचा फैलाव खूप वेगाने होत आहे. या परिस्थितीत रेशनिंग दुकानदार तसेच कामगार आणि वितरण अधिकारी हे धान्य वितरण करण्यासाठी आणि निरीक्षण यासाठी रात्रंदिवस झटत आहेत तसेच नागरिकांना सेवा देत आहेत.

रेशनिंग धान्य दुकानदार आणि तेथील कामगारांचा विविध ग्राहकांबरोबर दररोज संपर्क होत असतो. त्यामुळे रेशनिंग व्यवस्थेतील कामगार हमाल आणि वितरण अधिकारी यांची कोरोना च्या पार्श्वभूमीवर वैद्यकीय चाचणी करा, अशी सूचना माजी खासदार व ऑल इंडिया शाॅपकिपर फेडरेशनचे अध्यक्ष गजानन बाबर यांनी अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचे प्रधान सचिव यांच्या कडे केली आहे.

गजानन बाबर म्हणतात, एका दिवसात कमीत कमी 100 च्या वर नागरिकांचा रेशनिंग दुकानदार, हमाल व कामगार यांच्याशी संपर्क येत असतो. त्यामुळे खबरदारी म्हणून या कर्मचाऱ्यांची वैद्यकीय चाचणी करने गरजेचे आहे, तसेच वितरण अधिकारी यांची सुद्धा कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर चाचणी गरजेचे असल्याचे मत बाबर यांनी व्यक्त केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.