Pimpri : श्री साईबाबा पालखी सोहळ्यातील भाविकांसाठी भीमसेन अगरवाल यांच्यातर्फे औषधे

एमपीसी न्यूज – गुरुपोर्णिमेनिमित्त पुणे ते श्री क्षेत्र शिर्डी श्री साईबाबा पालखी सोहळ्याचे आज शनिवारी प्रस्थान करण्यात आले. या पालखी सोहळ्यात सहभागी झालेल्या भाविकांसाठी अग्रसेन ट्रस्ट चिंचवड प्राधिकरणाचे अध्यक्ष भीमसेन अगरवाल यांच्यातर्फे औषधाचे वाटप करण्यात आले.

पालखी सोहळ्याचे हे 31 वे वर्ष असून अकरा मुक्कामानंतर ही पालखी दि. 19 जुलैला गुरुपोर्णिमेच्या दिवशी शिर्डीत पोहचणार आहे. या पायीदिंडी सोहळ्यात हजारो भाविकांचा सहभाग असतो. या पालखी सोहळ्यात सहभागी झालेल्या भाविकांसाठी अग्रसेन ट्रस्ट चिंचवड प्राधिकरणाचे अध्यक्ष भीमसेन अगरवाल यांच्यातर्फे औषधाचे वाटप करण्यात आले. यामध्ये पॅरासिटॉमाल, ऍस्प्रीन, गेलुरी अशी सुमारे 9000 औषधांची पाकिटे साईबाबा पालखी सोहळा समितीचे अध्यक्ष शामराव हरिभाऊ वीर यांच्याकडे सुपुर्द करण्यात आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.