Chinchwad : रायरेश्वर माथाडी कामगार सहकारी पतसंस्थेची रौप्य महोत्सवी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात (व्हिडिओ)

एमपीसी न्यूज- पिंपरी-चिंचवड शहर आणि पुणे जिल्ह्यातील विविध उद्योग क्षेत्रात अग्रगण्य असलेल्या रायरेश्वर माथाडी कामगार सहकारी पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच पार पडली. पतसंस्थेने यंदा 25 वर्ष पूर्ण केली असल्याने पतसंस्था यावर्षी रौप्य महोत्सवी वर्ष साजरे करीत आहे. वाल्हेकरवाडी चिंचवड येथे ही सभा कामगार क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडली. या सभेमध्ये सभासदांच्या हिताचे विविध ठराव मंजूर करण्यात आले.

रायरेश्वर माथाडी कामगार सहकारी पतसंस्थेच्या रौप्यमहोत्सवी वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी खासदार श्रीरंग बारणे, शिरूर लोकसभा संघटक सुलभा उबाळे, उपशहर प्रमुख युवराज कोकाटे, युवा सेनेचे सचिन सानप, शिवसेना संस्थेचे अध्यक्ष ज्ञानोबा मुजुमले, सभेचे अध्यक्ष खंडू गवळी, संस्थेचे सचिव सतीश कंठाळे, संस्थेचे खजिनदार विजय खंडागळे, संचालक भिवाजी वाटेकर, ज्ञानेश्वर घनवट, रोहित नवले, ज्ञानेश्वर औताडे, प्रकाश चोरे, पाराजी व्यवहारे, सुभाष पुजारी, ललिता सावंत, पुष्पा काळे, महाराष्ट्र मजदूर संघटनेचे अध्यक्ष इरफान सय्यद, सल्लागार बाळासाहेब शिंदे, उपाध्यक्ष किसन बावकर, मुरलीधर कदम, कार्याध्यक्ष परेश मोरे, सरचिटणीस प्रवीण जाधव, सचिव पांडुरंग कदम, सर्जेराव कचरे, खजिनदार नागेश व्हनवटे संघटक उर्से गावचे सरपंच प्रदीप धामणकर,सुदेशजी ठोंबरे, रवी घोडेकर, राजू शेख, राजू तापकीर, मारुती कौदरे, पांडुरंग काळोखे, सुनील सावळे, गोरक्ष दुबाले, अशोक साळुंखे, ओंकार माने,समर्थ नाईकवडे,श्रीकांत मोरे, ज्ञानेश्वर पाचपुते, बाबासाहेब पोते, लक्ष्मण सापते, गोरक्ष बांगर, एकनाथ तुपे, रामा जाधव, तुळशीराम शिंदे, शंकर मदने, ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे पदाधिकारी प्रमोद भावसार, के. सी. शर्मा, दलबीर चौधरी, रोहतास चौधरी, संस्थेचे व्यवस्थापक प्रकाश पवार, वरिष्ठ लिपिक हनुमंत तरडे, लिपिक अभिजित शेलार आणि संस्थेचे हजारो सभासद उपस्थित होते.

रायरेश्वर माथाडी कामगार सहकारी पतसंस्थेचा एकूण अहवाल, जमा खर्च, अंदाज पत्रक, नफा वाटप इत्यादी ताळेबंदासह सभासदांनी सभेत विविध ठराव मंजूर केले. पतसंस्थेचे भाग भांडवल पाच कोटीपेक्षा अधिक असून दोन लाख रुपयांपेक्षा अधिक ठेवी, तर साडेअकरा लाख रुपयांपेक्षा अधिक कर्जवाटप करण्यात आले आहे. पतसंस्थेकडून सभासदांना पाच लाखांपर्यंतचे दीर्घ मुदतीचे कर्ज देण्याची तरतूद करण्यात आली आहे. यामुळे कष्टकरी वर्गाच्या अनेक समस्या यामुळे सोडविण्यासाठी पतसंस्था अग्रेसर असल्याचे दिसून येत आहे. रायरेश्वर माथाडी कामगार सहकारी पतसंस्थेला सुरुवातीपासून ‘अ’ दर्जा मिळत आहे. संस्थेचे संचालक मंडळ अत्यंत जबाबदारी आणि काटकसरीने काम करत आहे. यामुळे माथाडी कामगारांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले आहे. सर्वसाधारण सभेत सर्व कामगार सभासदांना भेट्वस्तूचे वाटप करण्यात आले.

यावेळी बोलताना कामगार नेते इरफान सय्यद म्हणाले, “पतसंस्थेचे काम सध्या एकजुटीने, काटकसरीने आणि कामगारांच्या हिताला प्राधान्य देत सुरु आहे. हे काम असेच अविरत पुढे चालू ठेवावे. महाराष्ट्र मजदूर संघटना वेळोवेळी माथाडी कामगारांच्या बरोबर उभी आहे.तसेच संघटनेचे सल्लागार बाळासाहेब शिंदे,व संस्थेचे संचालक भिवाजी वाटेकर यांनी मोलाचे मार्गदर्शन केले पतसंस्थेने सभासद आणि कष्टकरी कामगारांच्या उन्नतीसाठी विविध योजना सुरु केल्या आहेत. यापुढे देखील संचालक मंडळ कामगारांचे हित लक्षात ठेवूनच काम करणार असल्याचा विश्वास त्यांनी दिला”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.