BNR-HDR-TOP-Mobile

Pimpri : परिषदेच्या माध्यमांतून लघुउद्योजकांच्या समस्या सोडविणार – संदीप जोशी

PST-BNR-FTR-ALL

एमपीसी न्यूज – लघु उद्योजकाना भेडसावणाऱ्या समस्याबाबत ऑक्‍टोबरच्या पहिल्या आठवड्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत चर्चा करून राज्यातील सर्व संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसोबत परिषद आयोजित करण्यात येईल. तसेचया परिषदेच्या माध्यमातून उद्योजकांच्या समस्या सोडवण्यात येतील असे आश्वासन महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळाचे अध्यक्ष संदीप जोशी यांनी दिले. पिंपरी-चिंचवड लघु उद्योग संघटना व पवना औद्योगिक वसाहत सहकारी संस्था यांच्या संयुक्‍त विद्यमाने झालॆल्या बैठकीत संदीप जोशी बोलत होते.

बैठकीस पिंपरी चिंचवड लघु उद्योग संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे, सचिव जयंत कड, पवना औद्योगिक वसाहत सहकारी संस्थेचे अध्यक्ष प्रदीप सिन्नरकर, उपाध्यक्ष संजय जगताप, उपाध्यक्ष विनोद नाणेकर, खजिनदार संजय ववले, संजय सातव, माजी अध्यक्ष नितीन बनकर, संचालक विजय खळदकर, नवनाथ वायाळ, प्रमोद राणे, सचिन आडक, संजय आहेर, सुरेश जपे, मोहिनी जगताप, निस्सार सुतार, बशीर तरसगार, रमेश ढाके, विजय भिलवडे, प्रभाकर धनोकार, एमआयडीसीच्या पुणे विभागाचे व्यवस्थापक प्रमोद नाईक, सचिव महाजन, भट व लघु उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या वेळी लघु उद्योग संघटनेतर्फे लघु उद्योगांना भेडसावणाऱ्या समस्यांचे निवेदन जोशी यांना देण्यात आले. पिंपरी चिंचवड लघु उद्योग संघटनेतर्फे अध्यक्ष संदीप बेलसरे यांनी विविध समस्या मांडल्या. वीज दरवाढीची मुख्य समस्या असल्याचे सांगून त्यावर तोडगा काढण्याचे मागणी बेलसरे यांनी केली. उर्जामंत्री बावनकुळे यांनी वीजदर न वाढवण्याचे आश्वासन दिले होते. तरीही वीजदरवाढ लागू केली जात आहे. उर्जामंत्र्यांनी जर यावर तोडगा काढला नाही तर केंद्रीय विद्युत नियामक आयोगाकडे दाद मागतली जाईल. तिथेही निर्णय झाला नाही तर न्यायालयात याचिका दाखल केली जाईल, असे बेलसरे यांनी सांगितले.

पिंपरी चिंचवड औद्योगिक परिसरातील वीज पुरवठ्याचा पायाभूत सुविधा 55 वर्ष जुन्या झाल्या असून त्यामुळे वीज वितरणातअडथळे येतात. महिन्यातून 65 तास वीज खंडित होण्याचे प्रकार घडत आहेत. महावितरणकडे वेळोवेळी तक्रारी केल्यानंतरही त्याची दखल घेतली जात नाही. याबाबत लक्ष देण्याची मागणी बेलसरे यांनी केली. पालिकेला सर्वाधिक महसूल देऊन उद्योगांना पायाभूत सुविधा दिल्या जात नाहीत. लघुउद्योगांना वित्तपुरवठा करण्यास बॅंकेकडून नकार दिला जातो प्रधान मंत्री क्रेडिट गॅरंटी योजनातून ही पतपुरवठा करण्यास नकार दिला जातो. कंपनी कायद्यात फॅक्‍टरी हा शब्द घुसवल्यामुळे माथाडी कामगार संघटनेचा त्रास उद्योजकांना सुरू झाला आहे.

लघु उद्योजकांच्या समस्या व मागण्या ऐकल्यावर संदीप जोशी यांनी महानगरपालिका आयुक्‍त श्रावण हर्डीकर यांना फोन करून समस्या सोडवण्याची विनंती केली. उद्योजकांच्या समस्या सोडवण्यास प्राधान्य दिले जाईल, असे आश्वासन हर्डीकर यांनी जोशी यांना दिले.

HB_POST_END_FTR-A4
HB_POST_END_FTR-A1
.