Pimpri: सनदी लेखापाल संघटनेच्या सभासदांनी घेतली मतदान करण्याची शपथ

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्वीप मतदार जनजागृती कार्यक्रमांतर्गत पिंपरी-चिंचवड सनदी लेखापाल संघटनेच्या सभासदांनी लोकसभा निवडणुकीसाठी मतदान करण्याची शपथ घेतली.

यावेळी पिंपरी-चिंचवड महापालिकेचे मतदान नोंदणी अधिकारी संदीप खोत, स्वीप सचिव रमेश भोसले, समन्वयक प्रफुल्ल पुराणिक, तानाजी सावंत यांच्यासह संघटनेचे अध्यक्ष संतोष संचेती, सदस्य पंकज पाटणी, सचिन बंसल, सिमरन लिलवानी, संतोष रांका, अशोककुमार पगारिया, पंकज सुराणा, कुंतीलाल शिंगी, वैभव मोदी, भरतकुमार पटेल यांनी शपथ घेतली.
पिंपरी-चिंचवड महापालिकेचे स्वीप सचिव रमेश भोसले यांनी सर्वांना मतदान करण्याची शपथ दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.