Pimpri : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मेट्रोची सावधगिरी; कामगारांची आरोग्य तपासणी

एमपीसी न्यूज – कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी महामेट्रोकडून देखील उपाययोजना केल्या जात आहेत. कामगारांच्या आरोग्याच्या दृष्टीने आरोग्य शिबीरे आयोजित केली जात असून, स्वच्छतेचे निकषही पाळले जात असल्याचे महामेट्रोकडून सांगण्यात आले आहे.

महामेट्रोकडून घेण्यात आलेली खबरदारी –

# लेबर कॅम्पमध्ये कामगारांसाठी आरोग्य शिबिरे आयोजित केली जात आहेत.
# जास्त कामगार संख्या असलेल्या सर्व कास्टिंग यार्डांवर बाहेरील लोकांच्या प्रवेशावर बंदी घालण्यात आली आहे.
# कामाच्या आवारात प्रवेश करण्यापूर्वी त्यांना सॅनिटायझर्स आणि मास्क पुरविले जात आहेत.
# महामेट्रोच्या सर्व साईट, कार्यालयात कोरोनापासून वाचण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांचे जनजागृती फलक लावण्यात आले आहेत.
# कामगारांनी घ्यावयाच्या काळजीबाबत डॉक्टरांकडून मार्गदर्शन आणि नियमितपणे तपासणी केली जात आहे.
# महामेट्रोच्या सर्व कार्यालयात हस्तांदोलन करण्यावर बंदी घालण्यात आली आहे.
# कामगारांच्या कामाच्या आणि राहण्याच्या ठिकाणी आरोग्याच्या सुविधांबाबत काटेकोर लक्ष दिले जात आहे.
# सर्व कार्यालये आणि साईटवरील समारंभास बंदी घालण्यात आली आहे.
# कामाच्या ठिकाणी प्रवेशद्वारावरील कर्मचार्‍यांच्या वेळोवेळी तापाची तपासणी केली जात आहे.
# कोरोनाबाबत माहिती मिळविण्यासाठी महामेट्रोच्या सर्व कामगारांना संबंधित अधिकाऱ्यांचा संपर्क क्रमांक देण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.