Pimpri Metro News: मेट्रोच्या कामासाठी जुना पुणे-मुंबई महामार्गावरील रस्ता बंद

हा बदल 27 ऑगस्ट ते 10 सप्टेंबर 2020 या कालावधीसाठी असणार आहे.

एमपीसी न्यूज – मेट्रोच्या कामासाठी जुना पुणे-मुंबई महामार्गावरील फुगेवाडी येथील काही रस्ता ठराविक वेळी वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. हा बदल 27 ऑगस्ट ते 10 सप्टेंबर 2020 या कालावधीसाठी असणार आहे.

पुणे मेट्रोने दिलेल्या माहितीनुसार, पुणे मेट्रोचे काम पिंपरी-चिंचवड शहरात वेगाने सुरु आहे. मेट्रोचे काम अधिक तत्परतेने करण्यासाठी फुगेवाडी मेट्रो स्थानक ते सँडविक कंपनी येथील ग्रेड सेपरेटर रस्ता 27 ऑगस्ट ते 10 सप्टेंबर 2020 या कालावधीत सकाळी अकरा ते सायंकाळी सहा आणि रात्री अकरा ते सकाळी सहा या कालावधीत वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे.

या काळात बीआरटीएस मार्ग देखील बंद राहणार आहे. या कालावधीत नागरिकांनी सेवा रस्त्याचा वापर करावा. नागरिकांनी या बदलाची नोंद घ्यावी.

तसेच पुणे मेट्रोच्या कामासाठी सहकार्य करावे, असे आवाहन पुणे मेट्रोकडून करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.