Pimpri : प्रिमियर कंपनीचे चाकणला स्थलांतर; कामगार संघटनेशी कोणतीही चर्चा नाही

एमपीसी न्यूज – संघटित कामगारांना सामाजिक सुरक्षा लागू करावी. तसेच चिंचवड येथील प्रिमियर कंपनीतील कामगारांचे प्रश्‍न सोडवावेत, या मागणीसाठी वारंवार आंदोलन केले. कंपनीच्या करारानाम्यात कंपनीत चाकणला एक मार्चपासून स्थलांतर करावी, असे नमूद असून याबाबतीत कामगार संघटनेशी कोणतीही चर्चा झाली नाही.

प्रीमिअर कंपनीतील सर्व कामगार कंपनीच्या प्रगतीसाठी परिश्रम घेत आहेत. मात्र, कंपनी गेल्या अनेक वर्षांपासून कामगारांचे वेतन देत नाही. मुद्दाम सहा महिने, आठ महिने तर कधी वर्षभर वेतन दिले जात नाही. कामगारांना जाणीवपूर्वक त्रास दिला जातो. कंपनीची आर्थिक स्थिती भक्‍कम असतानाही वेतन देण्यास टाळाटाळ केली जात आहे. न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे पालन केले जात नाही. वेतन न मिळाल्याने, आर्थिक विवंचनेत कामगार सापडला आहे.

  • कामगाराची परिस्थिती नाजूक असून दोन वेळच्या जेवणाचे अवघड झाले आहे. अनेकांचे कर्जाचे हप्ते थकलेले आहेत. कामगारांच्या मुलांच्या शिक्षणाची फी भरणे अवघड झाले आहे. आर्थिक विवंचनेत कामगारांना टाकून व्यवस्थापन अन्याय करत आहे. कंपनीच्या कामगारांची पिळवणूक प्रिमियर कंपनीचे व्यवस्थापन करीत असल्याचा आरोप कंपनीतील कामगार संघटनेने केला. कामगारांच्या परिश्रमांतुन उभी राहिलेल्या या कंपनीच्या कामगारांच्या कुटुंबाला रस्त्यावर येण्याची वेळ आली आहे.

प्रिमियर कामगार संघटनेचे अध्यक्ष आशिष शिंदे म्हणाले, प्रिमियर कंपनीतील कामगारांवर होत असलेल्या अन्यायाबाबत कामगार सुमारे गेल्या वर्षी 54 दिवसाचे आंदोलन केले. व्यवस्थापनाने याची दाखल घेतली नाही. कंपनीत अनेक कामगारांचे कुटुंब बेकारीस आले आहे. कामगारांचे त्यांचे पीएफ, पगार गेल्या दोन महिन्यांपासून दिलेला नाही.

  • कंपनी स्थलांतरित होऊ नये म्हणून शिवाजीनगर येथील कामगार कार्यालयात दीडशे ते दोनशे जणांनी ना हरकती नोंदविल्या आहेत. कंपनी चाकणला स्थलांतरित करीत आहोत. याबाबतीत कंपनीने कामगार संघटनेशी कोणतीही चर्चा केली नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.