Pimpri : शहरातील खाजगी डॉक्टरांनी रुग्णसेवा सुरु ठेवण्याचे आमदार अण्णा बनसोडे आवाहन  

Pimpri: MLA Anna Bansode appeals to private doctors to continue patient care in the city

एमपीसी न्यूज – कोणत्याही परिस्थितीत शहरातील खाजगी डॉक्टरांनी सेवा बंद ठेऊ नये, असे आवाहन आमदार अण्णा बनसोडे यांनी खासगी डॉक्टरांना केले. 

कोविड –19 विषाणूचा प्रादुर्भाव पाहता शहरातील खाजगी व शासकीय डॉक्टरांची सुरक्षा महत्वाची असून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील खाजगी डॉक्टरांना एन- 95 मास्कचे वाटप आमदार बनसोडे यांनी केले.  यावेळी नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन, पिंपरी चिंचवड शाखेचे पदाधिकाऱ्यांनी शहरातील 1400 डॉक्टरांच्या वतीने आमदार बनसोडे यांच्या हस्ते एन- 95 स्वीकारले. यावेळी डॉक्टर संघटना पदाधिकाऱ्यांसमवेत झालेल्या चर्चेत, कोणत्याही परिस्थितीत शहरातील खाजगी डॉक्टरांनी सेवा बंद ठेऊ नयेत, असे आवाहन केले.

शासन यंत्रणेवर प्रचंड मोठ्या प्रमाणात ताण निर्माण झालेला असून खाजगी डॉक्टर सुध्दा कोरोनाच्या लढाईत मागे राहणार नाहीत, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शहरातील कोरोनाचा वाढत्या प्रादुर्भावामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असल्याने त्यांनी घाबरून न जाता स्वताःची आणि कुटुंबाची काळजी कशी घ्यावी याबात डॉक्टरांनी शहरातील नागरिकांना उपलब्ध माध्यामातून सतत मार्गदर्शन करावे, असेही विचार बनसोडे यांनी मांडले.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सर्व जगात पसरला असून यामध्ये बहुसंख्य डॉक्टर इतर रोगावर उपचार करत असताना कळत-नकळत कोरोना व्याधीने बाधित होत आहेत. त्यांच्या सुरक्षितेचा प्रश्न ऐरणीवर येत आहे. खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांना कोरोना विषाणू या व्याधींपासून बचावासाठी पुरेशी संरक्षक साधने उपलब्ध नाहीत . डॉक्टर समाजाची एवढी सेवा करतो त्याचं आरोग्य चांगल असणे आजच्या परिस्थितीमध्ये फार महत्त्वाचे आहे, त्या भावनेतून पिंपरी चिंचवडमधील डॉक्टरांच्या संरक्षणासाठी एन – 95 मास्क आज आकुर्डी येथे अध्यक्ष डॉ. सत्यजित पाटील यांना सुपूर्त केले. आवश्यकतेनुसार पुढेही पुरवठा करण्याचे आश्वासन बनसोडे यांनी दिले.

याप्रसंगी नगरसेवक डब्बू आसवानी, डॉ. सुनील पाटील डॉ. सत्यजित पाटील, डॉ. अभय तांबिले, डॉ.  नंदकुमार माळशिरसकर, डॉ. दत्तात्रय कोकाटे, डॉ. सुहास जाधव, डॉ. कल्पना एरंडे, डॉ. मयुरी मोरे आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.