Pimpri : आमदार बनसोडे यांची वायसीएम रुग्णालयास भेट ; परिचारिकांचे केले अभिनंदन

एमपीसी न्यूज –  आमदार अण्णा वनसोडे यांनी परिचारिका दिना निमित्त यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयास मंगळवारी (दि.12) भेट दिली आणि परिचारिकांचे प्रश्न समजून घेतले. तसेच उपस्थित परिचारिकांचे अभिनंदन केले.  

यावेळी रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. वाबळे, मनपा कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष अंबर चिंचवडे, अभिमान भोसले व  रुग्णालयाच्या अधिसेविका आणि  परिचारिका उपस्थित होत्या.

परिचारिकांनी काम करताना येणाऱ्या अडचणींचा पाढाच आमदारांसमोर मांडला. त्यावर आमदार बनसोडे यांनी रुग्णालयाची सुरक्षा,  कर्मचाऱ्यांना  संरक्षण, वेतन वाढ, पदोन्नती आदी प्रश्ना सोडविण्यासाठी तातडीने मनपा आयुक्त यांच्याशी चर्चा करण्याचे आश्वासन दिले.

कोविड -19 वार्ड मध्ये काम करणाऱ्या परिचारिकांशी चर्चा केली व त्यांचे मनोबल वाढविले. यापूर्वी आमदार बनसोडे यांनी या कोरोना रुग्णालयातील कक्षात काम करणाऱ्यासाठी आमदार निधीमधून  वायसीएम रुग्णालयास 45 लाख व जिल्हा रुग्णालयास 5 लाख रुपये निधी पीपीई कीट खरेदी करण्यासाठी दिलेला आहे.

कोणत्याही परिस्थितीत कोरोनासाठी आवश्यक निधी कमी पडणार नाही.  परंतू, कोरोना साथीच्या वेळी होणाऱ्या खर्चामध्ये भ्रष्टाचार झाल्यास कोणत्याही आणि कितीही उच्च पदस्त अधिकारी अथवा कर्मचाऱ्याची गय केली जाणार नाही.

वायसीएमच्या भेटी नंतर आमदार बनसोडे यांनी तत्काळ मनपा आयुक्त हर्डीकर यांची भेट घेऊन वायसीएम रुग्णालयातील प्रश्नाबाबत चर्चा केली.

यावेळी झालेल्या चर्चेत रुग्णालयाची सुरक्षा वाढवणे, कंत्राटी कर्मचारीवर्गास धोकादायक काम करीत असल्याने वाढीव भत्ता तसेच कोरोना कक्षात काम करीत असलेल्या चतुर्थ श्रेणी कर्मचारी वर्गास क्वारंटाइन रजा देण्यात बाबत आयुक्त सकारात्मक कार्यवाही करणार असल्याची माहिती आमदार बनसोडे यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.