Pimpri : पिंपरी न्यायालयाच्या नवीन जागेसाठी निधी मंजुर करण्याचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे आश्वासन

एमपीसी न्यूज – नेहरूनगर व मोशी येथील पिंपरी न्यायालयाच्या जागेच्या निधी संदर्भात आज महत्वाची बैठक पिंपरी चिंचवड शहर भाजपाचे अध्यक्ष आमदार  लक्ष्मण जगताप यांच्या समवेत पार पडली.नवीन जागेच्या संदर्भात निधी मंजुर करुन देण्याचे आश्वासन आमदार लक्ष्मण जगताप यांनी दिले.

महापौर राहुल जाधव व सभागृह नेते एकनाथ पवार यांच्या सूचनेनुसार पिपरी चिंचवड महापालिकेने सदराची जागा न्यायालयास 5 वर्षासाठी भाडेतत्वावर देण्यास सर्वसाधारण सभेत मान्यता देण्यात आली. फेब्रुवारी महिन्यात होणाऱ्या बजेट मिटींग मध्ये भाड्याच्या जागेत होणाऱ्या कोर्ट हॉल च्या फर्निचरसाठी व नवीन जागेच्या संदर्भात निधी मंजूर करून घेणार असल्याचे आमदार जगताप यांनीवकिलांना सांगितले. लवकरात लवकर नकाशे तयात करण्याच्या सुचना देखील बांधकाम विभागाच्या अधिकार्यांना देण्यात आल्या.

मुख्यमंत्र्यांची वेळ घेऊन लवकरात लवकर नवीन जागेचे भूमीपूजन करण्यासंदर्भात बैठक घेण्याचे आश्वासन दिले. बार असोसिएशनने 2 महिने सदरचा पाठपुरावा न्यायालयात करावा  अशी तंबी देखील देण्यात आली. आमदार महेश लांडगे यांची अधिवेशनामध्ये 25 कोटी रुपयांचा निधी बांधकामासाठी द्द्यावा यासंबंधी लक्षवेधी मांडली होती.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.