Pimpri : पूरग्रस्तांसाठी जीवनावश्यक साहित्याचे 25 ट्रक घेऊन आमदार महेश लांडगे सांगली, कोल्हापूरला रवाना

एमपीसी न्यूज – भोसरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश लांडगे यांच्या वतीने कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यातील पुरग्रस्तांच्या मदतीसाठी पंचवीस ट्रक भरून जीवनावश्यक साहित्य पाठविण्यात आले आहे. आमदार महेश लांडगे स्वतः ट्रकमध्ये बसून सर्व वाहने घेऊन कोल्हापूर, सांगली आणि सातारा भागातील पुरग्रस्तांकडे आज (मंगळवारी) सायंकाळी साडेचार वाजता रवाना झाले आहेत.

अतिवृष्टीमुळे कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यात पुरस्थिती निर्माण झाली. जिल्ह्यांतील गावांमध्ये पाणी शिरल्यामुळे अनेकांना बेघर होण्याची वेळ आली. अऩेकांचे संसार उघड्यावर पडले आहेत. स्वतःचा जीव वाचवणे नागरिकांना मुश्कील होऊन बसले आहे. अशावेळी सरकारी यंत्रणेने कार्यक्षमता दाखवून पुरात अडकलेल्या नागरिकांना वाचविले आहे. परंतु, घरात पाणी शिरल्याने त्यांच्या उपजिविकेचा प्रश्न निर्माण झाला आहे. पुरग्रस्तांच्या मदतीसाठी भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी स्वतः पुढाकार घेऊन जीवनावश्यक साहित्य एकत्रीत करून त्या भागात पाठविले आहे.

  • आमदार महेश लांडगे यांच्या पुढाकाराने एक हात पूरग्रस्तांसाठी हा उपक्रम सुरु आहे. त्याला नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत असून जीवनावश्यक साहित्य नागरिक देत आहेत. गहू, तांदूळ, बिस्कीट, धान्य, औषधे, कपडे, पाणी बॉटल असे साहित्य जमा झाले आहे. यापूर्वी पुरग्रस्तांसाठी 15 टेम्पो जीवनावश्यक साहित्य पाठविले होते.

आज पुन्हा जीवनावश्यक साहित्याचे तब्बल 25 ट्रक कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्याकडे पाठविण्याल्या आहेत. स्वतः आमदार महेश लांडगे ट्रकमध्ये बसून 25 वाहने घेऊन त्या भागात गेले आहेत. आमदार लांडगे यांच्या माध्यमातून जनावरांना सुध्दा चारा, पाणी देण्यासाठी तब्बल 150 लोकांची टीम पूरग्रस्त भागात कार्यरत आहे.

  • माजी महापौर नितीन काळजे, नगरसेविका सोनाली गव्हाणे, साधना मळेकर, सागर गवळी, अंकुश मळेकर, दत्ता गव्हाणे, भीमा बोबडे आदी पदाधिकारी, नगरसेवक, नगरसेविका, कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.