Pimpri: अनाथासांठी कार्य करणा-या संस्थेला आमदार महेश लांडगे यांचा ‘आधार’

एमपीसी न्यूज – वाढदिवसावर होणारा अनावश्यक खर्च टाळून आमदार महेश लांडगे यांनी अनाथ मुलांसाठी काम करणा-या ‘आधार’ या संस्थेला आर्थिक मदत केली. तसेच आमदारांची कन्या साक्षी लांडगे हिने ‘बेटी बचाओ’ चा संदेश देवून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस आदर्श पद्धतीने साजरा केला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस (दि. 22) विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला. माझ्या वाढदिवसानिमित्त अनावश्यक खर्च टाळून सामाजिक उपक्रम राबवावेत, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले होते. त्याला सकारात्मक प्रतिसाद देत आमदार लांडगे यांचे चिरंजीव मल्हार लांडगे यांनी दुष्काळग्रस्त शेतक-यांच्या चारा छावणीला भेट दिली. तेथील गुरांना मोफत चारा वाटप करण्यात आले.

  • आमदार लांडगे यांच्या सौभाग्यवती पूजा लांडगे आणि कन्या साक्षी लांडगे यांनी अनाथ मुलांसाठ काम करणा-या ‘आधार’ या संस्थेला आर्थिक मदत केली. पुणे जिल्ह्यात सुमारे 28 वर्षांपासून ही संस्था अनाथ मुलांसाठी काम करीत आहे. आधार सेंटरच्या अध्यक्षा अंजली जोशी यांच्याकडे मदतीचा धनादेश सोपवण्यात आला. पुण्यातील प्रसिद्ध वैद्य खाडीलकर यांनी या संस्थेची स्थापना केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.