BNR-HDR-TOP-Mobile

Pimpri : आमदार महेश लांडगे यांच्या चिरंजीवाचे सामाजिक भान; वाढदिवसाचा खर्च टाळून चारा छावणीला मदत

एमपीसी न्यूज – सध्या वाढदिवस म्हटले की जाहिरात, बॅनरबाजी करण्याची चढाओढ लागलेली असते. वाढदिवसावर नाहक पैसे खर्च केले जातात. परंतु, भोसरीचे आमदार महेश लांडगे यांचे चिरंजीव मल्हार यांनी वाढदिवसावरील अनावश्यक खर्च टाळून एक आदर्श घालून दिला आहे. मल्हार याने वाढदिवसानिमित्त शिरुर तालुक्यातील कान्हुर मेसाई येथील चारा छावणीस चारा दिला. यामुळे मल्हार याचे कौतुक केले जात आहे.

आमदार महेश लाडंगे यांचे चिरंजीव मल्हार लांडगे याचा आज (मंगळवारी) वाढदिवस आहे. वाढदिवस साजरा न करता त्याने सामाजिक कार्य करण्यावर भर दिला. राज्यातील दुष्काळातील दाहकता कमी करण्याकरिता महाराष्ट्र सरकाराने गुरांकरीता चारा छावणी सुरु केल्या आहेत.

  • वाढदिवसाचे औचित्य साधून मल्हार याने शिरुर तालुक्यांतील कान्हुर मेसाई येथील चारा छावणीस चारा दिला. यावेळी कान्हुर मेसाई येथील संजय पुंडे, विकास पुंडे, संतोष कांदळकर, मंगेश पवार, कैलास पुंडे, बाळासाहेब पुंडे, पिंपरी महापालिकेचे स्वीकृत नगरसेवक गोपी धावडे, संतोष फुगे उपस्थित होते.

यावेळी मल्हार लांडगे म्हणाला, ”राज्यात अद्यापही समाधानकारक पाऊस पडला नाही. ग्रामीण भागात आठवडा, दोन आठवडे पाणी मिळत नाही. मानव, जनावरे सर्वजण दुष्काळाच्या झळांनी होरपळून निघाले आहेत. जनावारांना चारा नाही. त्यामुळे वाढदिवसावरील अनावश्यक खर्च टाळून चारा छावणीला मदत केली.

HB_POST_END_FTR-A2

.