Pimpri : आमदार राम कदम यांच्या वक्तव्याचा पिंपरी-चिंचवड शिवसेना महिला आघाडीकडून निषेध

एमपीसी न्यूज – भाजपचे आमदार राम कदम यांनी दहीहंडीच्या कार्यक्रमात मुलींबद्दल केलेल्या वक्त्व्याचा शिवसेना महिला आघाडीकडून जाहीर निषेध करण्यात आला आहे. राम कदम यांनी जनतेची माफी मागावी, अन्यथा त्यांच्या पुतळ्याला पिंपरी-चिंचवड शिवसेना महिला आघाडीच्या वतीने जोडे मारो आंदोलन करण्याचा इशारा पिंपरी-चिंचवड शिवसेना महिला आघाडीच्या अध्यक्षा सुलभा उबाळे यांनी दिला आहे.

सोमवारी झालेल्या दहीहंडी उत्सवात घाटकोपरमधील भाजपचे आमदार आणि प्रवक्ते राम कदम यांनी तरुणांना उद्देशुन मुलींबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. या वक्तव्याचा सर्व स्तरातून निषेध व्यक्त करण्यात आला आहे. वास्तविक स्वत:च्या मतदारसंघातील मुला-मुलींच्या व्यक्तिगत आयुष्यात डोकावणे आणि मतदारसंघात कोण कोणावर प्रेम करते, कोण कोणाला प्रपोज करते आणि कोण कोणाला होकार किंवा नकार देते हे मतदारसंघातील आमदारांच्या कार्यकक्षेत येत नाही. मतदारसंघातील ही असली काम करण्यासाठी आमदारांना निवडून दिले जाते काय असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. राम कदम यांनी केलेल्या वक्तव्याचा पिंपरी-चिंचवड शिवसेना महिला आघाडीच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.