Pimpri : गॅस पाईपलाईन लिकेज झाल्याने परिसरात घबराट

एमपीसी न्यूज – नेहरूनगर येथे गॅस पाईपलाईन लिकेज झाल्याने परिसरात घबराटीचे वातावरण पसरले आहे. ही घटना आज, सोमवारी (दि. 20) सकाळी अकराच्या सुमारास घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, पिंपरी मधील नेहरूनगर येथे शीतल हॉटेलसमोर पाईपलाईनचे काम सुरू आहे. जेसीबीद्वारे पाईपलाईनसाठी खोदकाम केले जात आहे. सकाळी अकराच्या सुमारास जेसीबीचे काम सुरू असताना सीएनजी पाईपलाईन फुटली. यामध्ये गॅस लिकेज झाला आहे. दरम्यान परिसरामध्ये गॅसचा दुर्गंध पसरला आहे. कोणतीही दुर्घटना घडली नसली तरी परिसरातील नागरिकांमध्ये यामुळे भीतीचे वातावरण पसरले आहे. अग्निशमन विभागाचा एक बंब घटनास्थळी दाखल झाला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.