Pimpri: मनसे आक्रमक; पिंपरीत ग्रेडसेपरेटरमध्ये ठिय्या देत पुणे मुंबई महामार्ग रोखला (व्हिडिओ)

 

एमपीसी न्यूज – पेट्रोल, डिझेल व एलपीजी गॅसच्या दरांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याच्या निषेधार्थ काँग्रेस पक्षाने आज (सोमवारी) भारत बंद पुकारला आहे. या बंदला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सुद्धा पाठिंबा दिला असून राज्यभरात मनसेने आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला आहे.

पिंपरीत देखील मनसे पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात आक्रमक झाली आहे. मनसेचे शहराध्यक्ष सचिन चिखले यांच्या नेतृत्वाखाली पिंपरी महापालिका भवनासमोर पुणे-मुंबई द्रुतगती महामार्ग रोखून धरला. ग्रेडसेपरेटरमध्ये कार्यकत्यांनी ठिय्या आंदोलन करीत पुण्यावरुन निगडीकडे जाणारी वाहने मनसेने रोखून धरली.

पोलिसांनी यावेळी सचिन चिखले यांच्यासह अश्विनीताई बांगर, सीमा बेलापुरकर, अदिती चावरीया, स्नेहल बांगर, रुपालीताई गिलबिले, अनिता पांचाळ, शोभा चावरीया, मयुर चिंचवडे, अक्षय नाळे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

https://www.youtube.com/watch?v=q6pP3PNlHVA&feature=youtu.be

  

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.