Pimpri : मुंबईतील मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे – बाळा नांदगावकर

एमपीसी न्यूज – बांगलादेश, पाकिस्तान आणि नायजेरियनमधून भारतात आलेल्या परप्रांतीयांच्या विरोधात मनसेच्या वतीने 9 फेब्रुवारी रोजी मोर्चा काढण्यात येणार आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने या मोर्चात सहभाही होण्याचे आवाहन माजी गृहराज्यमंत्री, मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी केले.

_MPC_DIR_MPU_II

बांगलादेश, पाकिस्तान आणि नायजेरियनमधून भारतात आलेल्या परप्रांतीयांच्या विरोधात मनसेच्या वतीने 9 फेब्रुवारीला मुंबईत मोर्चा काढण्यात येणार आहे. त्याची आढावा बैठक रविवारी नांदगावकर यांच्या प्रमुख उपस्थित पार पडली. यावेळी मनसेचे नेते शिरिश सावंत, बाबू वागस्कर, पिंपरी-चिंचवड शहर प्रभारी किशोर शिंदे, गणेश सातपुते, रणजित शिरोळे, शहराध्यक्ष गटनेते सचिन चिखले यांच्यासह आजी-माजी पदाधिकारी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.