Pimpri : अहमदनगर जिल्ह्यातील चारा छावण्यांना मनसे शहराध्यक्ष सचिन चिखले यांची भेट

एमपीसी न्यूज – अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यात प्रचंड दुष्काळ आहे. पाण्याअभावी जनावरांचे हाल सुरु आहेत. पिण्याचे पाणी, वांबोरी चारी हे प्रश्नही आ- वासून उभे आहेत. त्यामुळे जनावरांसाठी चारा छावण्या उभारल्या आहेत. या चारा छावणीस पिंपरी-चिंचवड महापालिकेचे गटनेते व मनसे शहराध्यक्ष सचिन चिखले यांनी भेट दिली.

येथील दुष्काळी भाग व जनावरांसाठी उभारलेल्या चारा छावणीची पाहणी करुन आढावा घेतला.

  • पिण्याचे पाणी, वांबोरी चारी हे प्रश्नही तातडीने सुटले पाहिजेत. तातडीने आणखी छावण्या या परिसरात सुरु झाल्या पाहिजेत. त्याचबरोबर तहसीलदांरांनी टॅंकर मंजुरीचे अधिकार द्यावेत, यासाठी शासन दरबारी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन सचिन चिखले यांनी यावेळी शेतक-यांना दिले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.