Pimpri MNS News : ‘स्पर्धा परिक्षांच्या तयारीसाठी शहरातील अभ्यासिका सुरु करा’

मनसे गटनेते सचिन चिखले यांची मागणी

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणारे अनेक विद्यार्थी आहेत. कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर अभ्यासिका बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. मात्र, पुढील काही दिवसात महाराष्ट्र लोकसेवा आयोग, सरळ सेवा भरतीच्या परीक्षा होणार आहेत. त्यामुळे शहरातील अभ्यासिका लवकरात लवकर सुरु कराव्यात, अशी मागणी मनसे गटनेते, नगरसेवक सचिन चिखले यांनी पालिका आयुक्तांकडे केली आहे.

पुढील काही कालावधीनंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोग तसेच अन्य सरळ सेवा भरतीच्या स्पर्धा परिक्षा होणार आहेत. स्पर्धा परिक्षांचा अभ्यास करणारे अनेक विद्यार्थी शहरात आहेत. सध्या अभ्यासिका बंद असल्याने स्पर्धा परिक्षांचा अभ्यास करणा-या विद्यार्थ्यांची गैरसोच होत आहे.

याबाबत काही विद्यार्थ्यांनी नगरसेवक सचिन चिखले यांच्याकडे अभ्यासिका सुरु करण्याची मागणी केली होती. विद्यार्थ्यांची मागणी प्रशासनापर्यंत पोहोचविण्यासाठी नगरसेवक चिखले यांनी पालिका आयुक्तांकडे अभ्यासिका लवकरात लवकर सुरु करण्याची मागणी केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.