Pimpri: माठ फोडून मनसेचा पाणी कपातीचा निषेध; पाणीकपात रद्द करण्याची केली मागणी

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेने एक दिवसाआड सुरु केलेल्या पाणीपुरवठ्याच्या निषेधार्थ मनसेने महापालिका भवनासमोर आज (सोमवारी) माठ फोडून आंदोलन केले. पाणीकपात रद्द करण्याची मागणी केली.

आंदोलनात शहराध्यक्ष सचिन चिखले, हेमंत डांगे, अश्विनी बांगर, सीमा बेलापुरकर, सुजाता काटे, विशाल मानकरी, अनिता पांचाळ, वैशाली बोराटे, नितिन चव्हाण, अक्षय नाळे, मयूर कांबळे, प्रतिक शिंदे, विकास कदम, अजय अड़गळे, नारायण पठारे, तेजस दाते, सुजय शिंदे, दीपेन नाईक, नितिन कावळे, अधिकराव पोळ, राजू सावळे, चंद्रकांत दानवले, सुरेश सकट मयूर चिंचवडे, दत्ता देवतरासे, रूपेश पटेकर, स्वप्निल महंगरे, रोहित काळभोर, संगीता देशमुख, स्नेहल बांगर, श्रद्धा देशमुख आंदोलनात सहभागी झाले होते.

सचिन चिखले म्हणाले, पिंपरी-चिंचवड शहराला वर्षभर पाणी पुरेल एवढे मुबलक पाणीसाठा पवना धरणामध्ये आहे. तरी, देखील पाणी कपात करुन पिंपरी-चिंचवडकरांना वेठीस धरण्याचे काम महापालिका प्रशासन करत आहे. महापालिकेने लादलेल्या पाणी-बाणीचा आम्ही जाहीर निषेध करतो. अशा पद्धतीने नागरिकांना त्यांच्या मूलभूत हक्कांपासून वंचित ठेवण्याचे काम महापालिका प्रशासन करीत आहे, जे निषेधार्ह आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.