BNR-HDR-TOP-Mobile

Pimpri: चोरट्यांनी मोबाईल पार्सलची बॅग हिसकावली

INA_BLW_TITLE

एमपीसी न्यूज – दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी दुचाकीला अडकवलेली 84 हजार रूपये किंमतीचे दोन मोबाईल पार्सलची बॅग हिसकावून नेली.   ही घटना शुक्रवारी (दि.11) सकाळी सव्वा अकरा वाजता पिंपरीतील गिल पार्क येथे घडली.

हरेश लिलाराम चेलानी (वय 27, रा. विजय समर्थ कॉलनी, काळेवाडी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी चेलानी 74 हजार 900 रूपये किंमतीचा गुगल कंपनीचा एक मोबाईल व 9 हजार 350 रूपये किंमतीचा एमआय कंपनीचा असे दोन मोबाईलचे पार्लस घेऊन स्वारगेटला जात होते. गिल पार्क येथे दुचाकीला लावलेली पार्सलची पिशवी दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी हिसकावून नेली. सहायक पोलीस निरीक्षक शेख तपास करत आहेत.

HB_POST_END_FTR-A2

.