Pimpri : पूर्ववैमनस्यातून मोबईल दुकानदाराला बेदम मारहाण

एमपीसी न्यूज – सात महिन्यांपूर्वी झालेल्या भांडणाच्या रागातून तीन जणांनी मिळून एका मोबईल दुकानदाराला बेदम मारहाण केली. तसेच भांडणे सोडविण्यासाठी आलेल्या दुकानदाराच्या मित्राच्या खांद्यावर बिअरची बाटली मारली. ही घटना सोमवारी (दि. 26) रात्री साडेअकरा वाजता कराची हॉटेलसमोर पिपरी येथे घडली.

इम्रान इनामअल्ली अन्सारी (वय 22, रा. पिंपळे गुरव) असे जखमी दुकानदाराचे नाव असून त्यांनी याबाबत बुधवारी (दि. 28) पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी नासीर शेख (वय 22, रा. कासारवाडी), खाजा शेख (वय 22, रा. कासारवाडी) आणि एक अनोळखी साथीदार यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अन्सारी यांचे कराची हॉटेल समोर पिंपरी येथे मोबईलचे दुकान आहे. सोमवारी रात्री अन्सारी दुकान बंद करत होते. त्यावेळी त्यांच्या ओळखीचा नासीर शेख हा दुकानाजवळ आला. नासीर आणि फिर्यादी अन्सारी यांच्यात सात महिन्यांपूर्वी भांडण झाले होते. अन्सारी दुकान बंद करत असताना नासीर याने मोबईल पाहिजे म्हणून त्यांच्याशी वाद घातला.

त्यानंतर कारमधून खाजा शेख व त्याचा एक साथीदार आले. नासीर याने सिमेंटचा गट्टू, अनोळखी साथीदाराने लाकडी दांडक्याने मारून अन्सारी यांना जखमी केले. ही भांडणे सोडविण्यासाठी अन्सारी यांचा मित्र इम्रान सादिक अन्सारी आला असता आरोपी खाजा शेख याने इम्रानच्या खांद्यावर बिअरची बाटली मारली. इम्रानला मुक्कामार लागला आहे. या भांडणात फिर्यादी यांचा मोबईल फोन फुटला. आरोपींनी शिवीगाळ करून ‘तुला नंतर बघून घेतो’ अशी धमकी दिली. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.