Pimpri : मोबीन शेख टोळीतील पाचजणांना मोका ; निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कारवाई

एमपीसी न्यूज- निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देहूरोड येथील मोबीन ऊर्फ बुग्गी सलीम शेख टोळीवर मोका (महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांनी शनिवारी (दि. 19) याबाबचे आदेश दिले.

टोळी प्रमुख मोबीन ऊर्फ बुग्गी सलीम शेख (वय 23), संदिप ऊर्फ अल्टर दादू खलसे (वय 19), निखील ऊर्फ चिक्या भिकु वाल्मीकी (वय 23) संतोष दादू खलसे, सुरेश मुन्ना अवचिते (सर्व रा. देहरोड) असे मोक्काची कारवाई करण्यात आलेल्या गुन्हेगारांची नावे आहेत.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक विवेक मुगळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, शेख टोळीतील पाचही सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. या गुन्ह्यांच्या जोरावर ते परिसरात दहशत पसरवत होते. स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी त्यांनी संघटित गुन्हे करण्यास सुरुवात केली होती. या वाढत्या गुन्हयांना प्रतिबंध करण्यासाठी देहूरोडचे वरिष्ठ निरीक्षक मनीष कल्याणकर यांनी या टोळीवर मोका कारवाई करण्यासाठी प्रस्ताव पाठवला होता. या प्रस्तावास मंजुरी देत पोलीस आयुक्त बिष्णोई यांनी टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाईचे करण्याचे आदेश दिले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.