Pimpri : अत्याधुनिक सुविधांनी सजणार नेहरुनगर येथील बौद्ध विहार

महेश लांडगे यांच्या आमदार निधीतून होणार बुद्ध विहाराचे नूतनीकरण

एमपीसी न्यूज – पिंपरी, नेहरुनगर येथील बौद्ध विहाराचे भोसरीचे आमदार महेश लांडगे यांच्या विकास निधीतून नूतनीकरण करण्यात येणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुस्तकांचे ग्रंथालय, ध्यान मंदिर, अत्याधुनिक सुविधायुक्त असे बौद्ध विहार केले जाणार आहे. या कामाचे भूमिपूजन भाजप नगरसेवक विकास डोळस यांच्या हस्ते आज (सोमवारी) करण्यात आले.

‘क’ प्रभागाच्या स्वीकृत सदस्या वैशाली खाड्ये, सामाजिक कार्यकर्ते फारुक इनामदार, माजी नगरसेवक भगवान शिंदे, अमित परदेश, अमित देशमुख, बौद्धविहाराचे सभासद आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

  • यावेळी विकास डोळस म्हणाले, ”बौद्ध विहारातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार जनमासात पोहचविण्यासाठी मदत होणार आहे. भोसरीचे आमदार महेश लांडगे यांच्या विकासनिधीतून या बौद्ध विहाराच्या कामाला सुरुवात केली आहे. आमदार लांडगे यांच्या प्रयत्नातून देशातील पहिले संविधान भवन शहरात साकारले जाणार आहे. संविधान भवनामुळे सुस्कृत आणि सृजनशिल समाज निर्माण होण्यासाठी प्रयत्न होईल. त्यातून सशक्त भारत निर्माण होणार आहे. आमदार महेश लांडगे बौद्ध समाजासाठी मोठे काम करत असून त्यांचे कार्य कौतुकास्पद आहे. बौद्ध जणांच्या वतीने आमदार लांडगे यांचे मी मनापासून आभार मानतो.

अमित परदेशी म्हणाले, “पिंपरी, नेहरुनगर येथे स्थानिक नागरिकांनी 25 वर्षांपूर्वी बौद्ध विहार बांधले होते. पत्राच्या शेडमध्ये बौद्धविहार होते. त्याचे 25 वर्षांपासून नूतनीकरण झाले नव्हते. नूतनीकरणाचे काम रखडले होते. भोसरीचे आमदार महेश लांडगे यांच्या विकासनिधीतून बौद्ध विहाराचे नूतनीकरण केले जाणार आहे.

  • पत्र्याचे शेड बांधून स्लॅपचे बांधकाम केले जाणार आहे. 2000 हजार स्व्केअर फुटामध्ये अत्याधुनिक सुविधायुक्त असे बौद्ध विहार केले जाणार आहे. त्यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरील पुस्तकांचे ग्रंथालय, ध्यान मंदिर अशा विविध अत्याधुनिक सोयी-सुविधा उपलब्ध केल्या जाणार आहेत. या कामाचे आज भूमिपूजन करण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.