Pimpri : मॉडर्नचे विद्यार्थी लॉकडाऊनमध्ये गिरवताहेत ऑनलाइन शिक्षणाचे धडे

एमपीसी न्यूज – प्रोग्रेसिव्ह एजुकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष डॉ. गजानन एकबोटे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या निगडी येथील मॉडर्न कॉलेज ऑफ कॉमर्स अँड कम्प्युटर स्टडीज व मॉडर्न इन्स्टिटयूट ऑफ कॉम्पुटर एप्लिकेशन महाविद्यालयात विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणाचे धडे मिळत आहेत.

कोरोनामुळे सुरु असलेल्या लॉकडाऊनमध्ये  प्रत्येक माणूस घरात असला, तरी या स्थितीत महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. सदाशिव शिरगावे यांनी महाविद्यालयीन शिक्षक आणि विद्यार्थ्यांना एकत्र आणले आहे. सध्या महाविद्यालये बंद असल्याने विद्यार्थी आणि शिक्षकांना घरी थांबावे लागत आहे. परंतु, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून पिंपरी-चिंचवडसारख्या भागातील मॉडर्न कॉलेज या महाविद्यालयात एक प्रयोग सुरू झाला आहे.

महाविद्यालयाचे प्राचार्य व प्राध्यापक यांच्या कल्पनेतून या ऑनलाईन शैक्षिणक उपक्रमाची सुरूवात झाली आहे. झूम या संगणक प्रणालीच्या माध्यमातून विद्यार्थी आणि शिक्षकांना जोडले आहे. विद्यार्थी कॉमर्स शाखेचा, मॅनॅजमेन्ट असो की कम्प्युटर स्टडीजचा, त्याला दररोज त्याच्या विषयाचे शिक्षण मिळू लागले आहे.

एका संगणक प्रणालीद्वारे विद्यार्थी आणि शिक्षक एकत्र येतात त्यांना दररोज शिकवले जाते. हे शिकवणे एकतर्फी होत नाही. विद्यार्थी यात सहभागी होतो त्याच्या मनात असलेल्या शंका शिक्षकांना विचारतो आणि त्याचे निरसनही केले जाते. सगळ्यांच्या मनात कोरोनाची धास्ती असली तरी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याचा विचार लक्षात घेऊन हे पाऊल टाकले आहे. मनोज साठे – प्राध्यापक

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.