Pimpri: मोहननगर, आनंदनगर, चिंचवड स्टेशन, आकुर्डी भागात कोरोनाचे सर्वाधिक 72 बळी

Pimpri: Mohannagar, Anandnagar, Chinchwad station, Akurdi area has the highest number of 72 victims of corona मृतांमध्ये युवकांचाही समावेश होत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. श्वास घेण्याचा त्रास होत असलेल्या कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे.

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात श्वास घेण्याचा त्रास होत असलेल्या कोरोना रुग्णांमध्ये वाढ होत असल्याने मृत्यूचे प्रमाणही वाढले आहे. पालिकेच्या ‘अ’ क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील संभाजीनगर, मोहननगर, आनंदनगर, चिंचवड स्टेशन, आकुर्डी, प्राधिकरण, आनंदनगर, भाटनगर मधील आजपर्यंत सर्वाधिक कोरोनाचे 72 बळी गेले आहेत. तर, ‘इ’ क्षेत्रीय कार्यालय हद्दीतील भोसरी, गवळीनगर, चऱ्होली, दिघीतील 4159 आजपर्यंत बाधित झाले आहेत.

पिंपरी-चिंचवड शहरातील रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. वाढत्या रुग्णसंख्येबरोबरच मृत्यूचे प्रमाणही वाढले आहे. मागील काही दिवसांपासून 11 ते 16 जणांचा दिवसाला मृत्यू होत आहे.

मृतांमध्ये युवकांचाही समावेश होत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. श्वास घेण्याचा त्रास होत असलेल्या कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे मृत्यूचे प्रमाण वाढल्याचा दावा पालिकेच्या वैद्यकीय विभागाकडून केला जात आहे. आजपर्यंत शहरातील 384 जणांचा तर शहराबाहेरील पण पालिका रुग्णालयात उपचार घेणा-या 94 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

क्षेत्रीय कार्यालयानिहाय मृत्यू झालेल्या आजपर्यंतच्या रुग्णांची संख्या

‘अ’ – क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत येत असलेल्या संभाजीनगर, मोहननगर, आनंदनगर, चिंचवड स्टेशन, आकुर्डी, प्राधिकरण, आनंदनगर, भाटनगर भागात सर्वाधिक 72 जणांचा आजपर्यंत मृत्यू झाला आहे.

‘ब’ – क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत येत असलेल्या रावेत, किवळे-विकासनगर, बिजलीनगर, चिंचवडेनगर, चिंचवड प्रभागातील 44 जणांचा मृत्यू झाला आहे.

‘क’ – क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत येत असलेल्या नेहरूनगर, खराळवाडी, अजमेरा, बोऱ्हाडेवाडी, धावडेवस्ती, इंद्रायणीनगर भागातील 42 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

‘ड’ – क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत येत असलेल्या वाकड, पिंपळेनिलख, पिंपळेसौदागर, पिंपळेगुरव भागातील 22 जणांचा मृत्यू झाला आहे.

‘इ’ – क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत येत असलेल्या भोसरी, गवळीनगर, चऱ्होली, दिघी परिसरातील 52 जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे.

‘फ’ – क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत येत असलेल्या चिखली, कृष्णानगर, तळवडे-रुपीनगर, यमुनागनर, निगडी गावठाण, सेक्टर क्रमांक 22 या प्रभागातील 33 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

‘ग’ – क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत येत असलेल्या पिंपरीगाव, थेरगाव, गणेशनगर, रहाटणी भागातील 50 जणांचा बळी गेला आहे.

‘ह’ – क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत येत असलेल्या संत तुकारामनगर, महात्मा फुलेनगर, दापोडी, फुगेवाडी, कासारवाडी, नवी सांगवी, सांगवी भागातील 62 जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे.

आजपर्यंतची प्रभागनिहाय बाधित रुग्णांची संख्या

‘अ’ क्षेत्रीय कार्यालय हद्दीतील 4101 जण बाधित झाले असून त्यातील 3086 जण बरे झालेत. 943 जणांवर उपचार सुरु आहेत. ‘ब’ मध्ये 2612 जण बाधित झाले होते. त्यातील 1687 बरे झाले. तर, 881 जणांवर उपचार सुरु आहेत.

‘क’ मध्ये 2022 बाधितांपैकी 1481 ठणठणीत झाले. 499 जणांवर उपचार सुरु आहेत. ‘ड’ कार्यालय हद्दीत 1714 बाधित झाले. त्यातील 1206 बरे झाले तर 486 जणांवर उपचार सुरु आहेत.

‘इ’ प्रभागात आजपर्यंत सर्वाधिक 4159 बाधित झाले. त्यापैकी 2711 बरे झाले असून 1396 जणांवर उपचार सुरु, ‘फ’ 2657 बाधितांपैकी 1630 जणांची कोरोनावर मात, 994 जणांवर उपचार सुरु, ‘ग’ प्रभागात 3018 बाधित झाले.

त्यातील 1984 बरे झाले असून 984 जण उपचार घेत आहेत. ‘ह’ प्रभागातील 2170 बाधितांपैकी 1694 बरे झाले आहेत. 414 जणांवर उपचार सुरु आहेत. पालिकेने रविवारी (दि.2) प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.