Pimpri : ‘व्हॅलेंटाईन डे’च्या शुभेच्छा दिल्या म्हणून त्याने केला तिचा विनयभंग

एमपीसी न्यूज – फेब्रुवारी महिन्यात 14 तारखेला जगभर साजरा होणा-या व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी शुभेच्छा दिल्या म्हणून एका 50 वर्षीय इसमाने 36 वर्षीय महिलेचा पाठलाग करून तसेच तिच्याशी अश्लील वर्तन करून विनयभंग केला. ही घटना विठ्ठलनगर पिंपरी येथे 17 फेब्रुवारी ते 20 मे या कालावधीत घडली.

रमेश दादुराव साळवे (वय 50, रा. विठ्ठलनगर, पिंपरी) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी 36 वर्षीय महिलेने फिर्याद दिली.

  • पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फेब्रुवारी महिन्यात व्हॅलेंटाईन डे निमित्त फिर्यादी महिलेने रमेश याला शुभेच्छा दिल्या. त्यानंतर रमेश याने महिलेकडे वारंवार ‘तू मला व्हॅलेंटाईन डे ला विश का केलंस’ अशी विचारणा केली. तसेच महिलेशी अश्लील वर्तन करून तिचा विनयभंग केला.

हा प्रकार मागील तीन महिन्यांपासून सुरु होता. त्यामुळे महिलेला शुभेच्छा देणं चांगलंच महागात पडलं आहे. याबाबत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. पिंपरी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.