Pimpri : पत्नीला अश्लील एसएमएस पाठविल्याप्रकरणी पतीवर गुन्हा

एमपीसी न्यूज – पतीने पत्नीला अश्लील एसएमएस पाठविला. यामुळे पत्नीने पोलीस ठाण्यात धाव घेत विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. ही घटना पिंपरी येथे घडली.

याबाबत 35 वर्षीय विवाहितेने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी अश्लील एसएमएस पाठविणाऱ्या 38 वर्षीय पतीवर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला पिंपरी येथे राहतात. तर त्यांचा आरोपी पती नाशिक येथे राहतो. आरोपीने 30 डिसेंबर रोजी दुपारी सव्वाचार वाजताच्या सुमारास आपल्या पत्नीला अश्लील एसएमएस पाठवत तिच्या मनात लज्जा उत्पन्न करीत तिचा विनयभंग केला. याबाबत संतापलेल्या पत्नीने पिंपरी पोलिसात धाव घेत पतीविरोधात गुन्हा नोंदवला. पोलीस उपनिरीक्षक हरिदास बोचरे तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.