Pimpri : तरुणीचा विनयभंग करून तिच्या भावाला मारहाण केल्याप्रकरणी एकावर गुन्हा

एमपीसी न्यूज – तरुणीसोबत अश्लील चाळे करून तिचा विनयभंग केला. त्यानंतर तिच्या भावाच्या डोक्यात फरशीने मारून त्याला जखमी केले. ही घटना सोमवारी (दि. 11) इंदिरानगर येथे घडली.

चंद्रकांत हनुमंता पवार (वय 30, रा. इंदिरानगर, चिंचवड) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी 19 वर्षीय पीडित तरुणीने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पीडित तरुणी घरी असताना आरोपी तिच्या घरी आला. त्याने तिच्याशी अश्लील कृत्य करून तिचा विनयभंग केला. त्यानंतर पीडित तरुणीच्या भावाच्या डोक्यात फरशी मारली. यामध्ये भाऊ जखमी झाला. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक शिरसाठ तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.