Pimpri : भर बाजारात दोन रोडरोमिओंकडून तरुणीचा विनयभंग

एमपीसी न्यूज – भावासोबत खरेदीसाठी गेलेल्या तरुणीचा भर बाजारपेठेत दोन रोडरोमिओंनी विनयभंग केला. तसेच तरुणीच्या भावालाही मारहाण करण्यात आली. ही घटना पिंपरी येथे घडली.

जुबेर रफिक अत्तार (वय 23, रा. काळेवाडी) आणि आफताब (पूर्ण नाव, पत्ता माहिती नाही) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत 20 वर्षीय तरुणीने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

_MPC_DIR_MPU_II

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणी ही शनिवारी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास आपल्या भावासोबत पिंपरीतील साई चौकात खरेदीसाठी गेली होती. त्यावेळी तिथे आलेल्या आरोपी आफताब याने जुबेर याला व्हिडिओ कॉल केला आणि फिर्यादी खरेदीसाठी आल्याचे सांगितले. ही काय फालतूगिरी आहे, असे फिर्यादी म्हणाल्या.

मात्र त्यानंतरही आरोपी आफताब याने पाठलाग सुरूच ठेवला. त्यानंतर तिथे आलेल्या जुबेर याने तरुणीचा पाठलाग केला. तसेच तिच्या भावाला शिवीगाळ करीत धक्‍काबुक्‍की केली. ‘तू माझी आहेस आणि तुझे लग्न दुसऱ्या कोणाशीच होऊ देणार नाही. तू जर माझी झाली नाही तर तुला कोणाचीच होऊ देणार नाही’, अशी धमकी दिली. तसेच फिर्यादी तरुणीच्या आई-वडिलांनाही आरोपींनी मारण्याची धमकी दिली. पोलीस उपनिरीक्षक कामठे याबाबत अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1