Pimpri : मामाकडून अल्पवयीन भाचीचा विनयभंग; मामासह मामीवरही गुन्हा दाखल

Molestation of minor niece by uncle ; A case was also registered against the uncle and aunt : मामाने गैरवर्तन करून 'बॅड टच' केल्याचे अल्पवयीन मुलीने तिच्या पालकांना सांगितले.

एमपीसी न्यूज – अल्पवयीन भाची आपल्या आई-वडिलांसोबत मामाकडे दिवाळीच्या सुट्टीत आली होती. सुट्टीत मामाच्या घरी राहत असताना मामाने गैरवर्तन करून ‘बॅड टच’ केल्याचे अल्पवयीन मुलीने तिच्या पालकांना सांगितले. सुरुवातीला बदनामी होईल म्हणून फिर्याद दिली नाही. मात्र, कालांतराने विचार करून याबाबत पीडित मुलीच्या वडिलांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

त्यानुसार पोलिसांनी 30 वर्षीय मामा आणि त्याच्या पत्नीवर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार नोव्हेंबर 2016 ते मे 2019 या कालावधीत घडला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नोव्हेंबर 2016 मध्ये पीडित पाच वर्षीय मुलगी तिच्या आई आणि वडिलांसोबत मामाच्या गावाला पिंपरी येथे दिवाळी सुट्टीसाठी आली होती.

सुट्टीत मामाच्या घरी राहत असताना मामाने भाचीसोबत गैरवर्तन करून तिचा विनयभंग केला.

त्यानंतर पुन्हा सन 2019 मध्ये घरी कोणी नसताना मामीने पीडित अल्पवयीन मुलीला मारहाण करुन तिच्या अंगावर चिमेट घेतले. घरी आल्यानंतर मुलीने मामाने केलेला प्रकार आईला सांगितला.

या प्रकारानंतर मुलीची बदनामी होईल व मामाकडून धोका निर्माण होईल या भितीने त्यांनी तक्रार दिली नव्हती.

त्यानंतर विचार करुन या घटनेची 23 जुलै रोजी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यात आली आहे.

पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.