Pimpri : पाठलाग करून तरुणीचा विनयभंग; संशयित तरुणाविरोधात गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – तरुणीचा पाठलाग करून तरुणीचा विनयभंग केल्याचा प्रकार सोमवारी (दि. 8) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास नेहरूनगर, पिंपरी येथे घडला.

याप्रकरणी 18 वर्षीय पीडित तरुणीने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार शशीकांत आशीष गायकवाड (वय 18, रा. विठ्ठलनगर, पिंपरी) या तरुणाविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.

  • पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी सोमवारी सायंकाळी साडे पाचच्या सुमारास नेहरूनगर येथील राजीव गांशी शाळेजवळून जात होती. दरम्यान, संशयित आरोपी गायकवाड याने तिला अडवून तिचा विनयभंग केला. तसेच ‘ तू जर माझ्या बरोबर फिरायला आली नाहीस तर तुला आणि तुझ्या घरच्यांना बघून घेईन’, अशी धमकीहि दिली. याबाबत गुन्हा दाखल केला असून पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.