Pimpri : डॉक्टरकडून पेशंट तरुणीचा विनयभंग

एमपीसी न्यूज – डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटल पिंपरी येथील एका डॉक्टरने तपासणीसाठी आलेल्या पेशंट तरुणीशी अश्लील वर्तन करून तिचा विनयभंग केला. ही घटना रविवारी (दि. 23) दुपारी अडीचच्या सुमारास पिंपरी येथे घडली.

हर्षल बसवराज निबान्नवर (वय 28, रा. पिंपरी, मूळ रा. धारवाड, कर्नाटक) असे गुन्हा दाखल झालेल्या डॉक्टरचे नाव आहे. याप्रकरणी 20 वर्षीय तरुणीने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी दुपारी अडीचच्या सुमारास पीडित तरुणी पिंपरी येथील डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटल येथे उपचारासाठी आली. लेबर रूम वॉर्ड नंबर 58 मध्ये असलेल्या हर्षल याने तपासण्याच्या बहाण्याने तरुणीशी अश्लील चाळे केले. ‘तुम्हाला बरे वाटू अगर न वाटू तुम्हाला चार दिवस ऍडमिट राहावे लागेल. मी तुम्हाला चहा नाष्टा आणून देऊ का?’ असे म्हणून त्याने तरुणीचा विनयभंग केला. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.