Pimpri : नळावर महिलेवर अतिप्रसंगाचा प्रयत्न

एमपीसी न्यूज- एका मूकबधिर व्यक्तीने नळावर पाणी भरण्यासाठी आलेल्या महिलेवर अतिप्रसंगाचा प्रयत्न करत झटापट केली. बुधवारी (दि.१०) रात्री पावणेनऊच्या सुमारास पिंपरीतील देवधर रुग्णालयाजवळ ही घटना घडली.

याप्रकरणी ४० वर्षीय पीडित महिलेने फिर्याद दिली असून राजेश सेवकराम क्रोडनानी (वय-46 रा. पिंपरी) याच्यावर पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी महिला या बुधवारी रात्री देवधर रुग्णालय जवळील परिसरात पाणी भरण्यासाठी गेल्या. यावेळी मूकबधिर राजेश त्याठिकाणी आला. त्याने अश्‍लिल वर्तन करण्यास सुरुवात केली. यावेळी फिर्यादी या तेथून निघून जात असताना आरोपीने त्यांचा हात पकडला यावेळी झटापट झाली असता फिर्यादी यांना दुखापत झाली. त्यानंतर फिर्यादी यांनी थेट पिंपरी पोलीस ठाण्यात धाव घेत फिर्याद दिली. उपनिरीक्षक अशोक निमगिरी अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.