Pimpri : पैशाच्या वादातून मुलाच्या मित्राकडून महिलेचा विनयभंग

एमपीसी न्यूज – पैशाच्या वादातून मुलाच्या मित्राने महिलेचा विनयभंग केला. तसेच कारची तोडफोड केली. ही घटना पिंपरीगाव येथे मंगळवारी (दि. 22) सायंकाळी घडली.

_MPC_DIR_MPU_II

दिगंबर ज्ञानोबा कुदळे (वय 29), नितीन क्षीरसागर (दोघेही रा. जगदंबा स्वीटजवळ, पिंपरीगाव) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी 48 वर्षीय महिलेने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यातील आरोपी हे फिर्यादी महिलेच्या मुलाचे मित्र आहेत. त्यांच्यात उसने पैसे घेण्यावरून वाद झाला. यावेळी आरोपींनी फिर्यादी महिलेला मारहाण केली. तसेच विनयभंग करीत मोटारीची तोडफोडही केली. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.