Pimpri : अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणी चौघांवर गुन्हा

एमपीसी न्यूज – गरबा खेळून घरी जात असलेल्या अल्पवयीन मुलीचा चार जणांनी विनयभंग केला. ही घटना पिंपरी येथे मंगळवारी (दि. 1) घडली.

अक्षय तुरूकमारे, राहूल दांडे (दोघेही रा. बौद्धनगर, पिंपरी), सोनू आणि सचिन (पूर्ण नाव, पत्ता माहिती नाही) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी 17 वर्षीय मुलीने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री साडेअकरा वाजताच्या सुमारास फिर्यादी मुलगी ही गरबा खेळून आपल्या घरी पायी जात होती. त्यावेळी मोटारीतून आलेल्या आरोपी अक्षय तुरूकमारे याने तिच्याजवळ मोटार थांबविली आणि तिला गाडीत बसण्यास सांगितले. त्यानंतर आरोपींनी फिर्यादी मुलीच्या नातेवाईकांनाही मारहाण केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.