Pimpri : उदरनिर्वाह निधीसाठी ‘महा ई सेवा केंद्र’ चालकांचे सोमवारी आंदोलन

एमपीसी न्यूज – लाॅकडाऊनमुळे गेली दोन महिने महा ई सेवा केंद्र बंद असल्यामुळे या केंद्र चालकांचा उत्पन्नाचा मार्ग बंद झाला आहे. वेळोवेळी शासनाकडे केंद्र चालकांच्या निधीसाठी पाठपुरावा करून सुद्धा या मागणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे भारतीय राष्ट्रवादी पार्टीचे प्रदेशाध्यक्ष अजित संचेती यांनी सोमवारी (दि.25) महा ई सेवा केंद्र चालकांना आंदोलनाची हाक दिली आहे.

संचेती यांनी महा ई सेवा केंद्र चालकांना स्वत:च्या केंद्राबाहेर उभे राहून आंदोलन करण्याची सूचना केली आहे. संचेती यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की, सरकारकडे केंद्र चालकांच्या उदरनिर्वाह निधीसाठी वेळोवेळी मागणी करून सुद्धा सरकार या मागणीकडे दुर्लक्ष करत असल्यामुळे सोमवारी प्रत्येक केंद्र चालकांने आपल्या केंद्रासमोर उभे राहून शांततेत आंदोलन करण्याचे आवाहन केले आहे.

दरम्यान, या आंदोलनाला कोणत्याही प्रकारची गर्दी, सरकार विरोधी घोषणाबाजी न करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. उदरनिर्वाह निधीची मागणी करणारे निवेदन सर्व केंद्र चालकांनी सरकारी यंत्रणेला पाठवण्यास सांगितले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.