Pimpri: शहरात सक्रिय रुग्णांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या जास्त; आजपर्यंत 701 जणांची कोरोनावर मात

Pimpri: More cured than active patients in the city; till date, 701 people have successfully defeated Corona शहरातील 491 सक्रिय रुग्णांपैकी कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आहे. पण, लक्षणे काहीच नाहीत असे 285 रुग्ण आहेत.

‌एमपीसी न्यूज- पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोनाच्या रूग्ण संख्येत झपाट्याने वाढ होताना दिसून येत असली. तरी रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही जास्त आहे. शहरातील 1214 जणांना आत्तापर्यंत कोरोनाची लागण झाली आहे. त्यापैकी 701 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. तर, सध्या 491 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

यामध्ये सक्रिय रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या जास्त आहे. तसेच 80 टक्के सक्रिय रुग्णामध्ये कोरोनाची काहीच लक्षणे नाहीत. केवळ रिपोर्ट पॉझिटिव्ह आहे. ही दिलासादायक बाब मानली जात आहे. आज दुपारी एक वाजेपर्यंत 30 नवीन रुग्णांची भर पडली आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात 10 मार्च रोजी कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला होता. काही दिवस रुग संख्येत वाढ होत 12 पर्यंत पोहोचली होती. दरम्यानच्या काळात नवीन एकही रुग्ण सापडला नव्हता.

परंतु, त्यानंतर एप्रिलपासून दररोज रुग्ण सापडण्यास सुरुवात झाली आहे. बघता बघता कोरोनाने संपूर्ण शहराला विळखा घातला. झोपडपट्टीसह शहराच्या संपूर्ण भागात कोरोनाचे रुग्ण आहेत.

दररोज शहराच्या नवीन भागात रुग्ण सापडत आहेत. 10 मार्च ते 15 जून दरम्यान रुग्ण संख्या 1214 वर जावून पोहचली आहे. त्यामुळे ही चिंतेची बाब मानली जात असली. तरी, त्यामध्ये रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे.

शहरातील 1214 जणांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली आहे. त्यापैकी 701 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. तर, सध्या 491 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरु आहेत. यामुळे सक्रिय रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या जास्त आहे. ही दिलासादायक बाब मानली जात आहे. तर, शहरातील 22 जणांचा कोरोनामुळे आजपर्यंत मृत्यू झाला आहे.

285 रुग्णांमध्ये कोरोनाची काहीच लक्षणे नाहीत!
शहरातील 491 सक्रिय रुग्णांपैकी कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आहे. पण, लक्षणे काहीच नाहीत असे 285 रुग्ण आहेत. तर, 147 रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणे आहेत. लक्षणे असलेल्या रुग्णांचीही वाढ होवू लागली आहे.

22 रुग्णांची प्रकृती गंभीर असून आजपर्यंत कोरोनामुळे 22 जणांचा मृत्यू आजपर्यंत झाला आहे. तर, 701 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. ही दिलासादायक बाब मानली जात आहे.

सर्वाधिक 491 तरुणांना कोरोनाची बाधा
पिंपरी-चिंचवड शहरातील तरुणांना कोरोनाने अक्षरश: विळखा घातला आहे. 22 ते 39 वय वर्ष असलेल्या शहरातील तब्बल 491 तरुणांना कोरोनाची आत्तापर्यंत लागण झाली आहे. हे सर्वाधिक प्रमाण आहे.

त्याखालोखाल 40 ते 59 वयोगटातील प्रौढांना लागण होण्याचे प्रमाण आहे. या वयोगटातील 294 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.

त्यानंतर 13 ते 21 वयवर्ष असलेल्या 148 किशोरवयीन मुलांना कोरोनाची लागण झाली आहे. तर, 0 ते 12 वयवर्ष असलेल्या 145 लहान मुलांना कोरोनाची बाधा झाली आहे. याशिवाय 60 वर्षापुढील 135 वृद्धांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.