Morwadi : सुखवाणी क्लासिकमधून कारची चोरी

एमपीसी न्यूज – वाहन चोरीच्या गुन्ह्यात दिवसेंदिवस भर पडत आहे. अज्ञात चोरट्यांनी पिंपरी परिसरातून कार चोरून नेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत बुधवारी पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अभिजित प्रभाकर एमगेकर (वय 32, रा. मोरवाडी, पिंपरी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी त्यांची अडीच लाख रुपये किमतीची एमएच 14/ जीएच 1253 ही कार 8 मार्च रोजी रात्री दहा वाजता सुखवाणी क्लासिक मोरवाडी येथे पार्क केली. रात्री अज्ञात चोरट्यांनी कार चोरून नेली. हा प्रकार 9 मार्च रोजी सकाळी उघडकीस आली. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.