Pimpri : मोशी, चिंचवड, चिखलीमधून सव्वा लाखांच्या दुचाकी चोरीला

एमपीसी न्यूज – मोशी, चिंचवड आणि चिखली परिसरातून एक लाख 20 हजार रुपये किमतीच्या तीन दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्या. याप्रकरणी शनिवारी (दि. 21) संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

दुचाकी चोरीचा पहिला प्रकार गंधर्वनगरी मोशी येथे घडला. संदेश महादेव गावस्कर (वय 23, रा. आदर्शनगर, गंधर्वनगरी, मोशी) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्याचा विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी संदेश यांनी त्यांची 40 हजार रुपये किमतीची दुचाकी (एमएच 14 / एचएफ 0162) 19 मार्च रोजी सायंकाळी घरासमोर पार्क केली. अज्ञात चोरट्यांनी त्यांची दुचाकी चोरून नेली.

हा प्रकार 20 मार्च रोजी सकाळी उघडकीस आला. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

दुचाकी चोरीचा दुसरा प्रकार तानाजीनगर चिंचवड येथे उघडकीस आला. विजय महादेव राठोड (वय 30, रा. ब्रह्मचैतन्य अपार्टमेंट, तानाजीनगर, चिंचवड) यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी राठोड यांनी त्यांची 40 हजार रुपये किमतीची दुचाकी (एमएच 14 / एफयु 3254) हे 18 मार्च रोजी रात्री आठ वाजता त्यांच्या इमारतीच्या पार्किंगमध्ये पार्क केली. रात्री अज्ञात चोरट्यांनी त्यांची दुचाकी चोरून नेली.

हा प्रकार 19 मार्च रोजी दुपारी साडेबारा वाजता उघडकीस आला. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.

दुचाकी चोरीचा तिसरा प्रकार चिखली येथे उघडकीस आला. अनिल हिरामण लष्करे (वय 23, रा. काळाखडक, वाकड) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याचा विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी लष्करे यांनी त्यांची 40 हजार रुपये किमतीची दुचाकी (एमएच 14 / एचएफ 9710) त्यांचे ताम्हाणे वस्ती, चिखली येथील मित्र महादेव अशोक भोसले यांच्या घराजवळ असलेल्या मोकळ्या मैदानात 16 मार्च रोजी रात्री पार्क केली. मोकळ्या मैदानातून अज्ञात चोरट्यांनी दुचाकी चोरून नेली.

हा प्रकार 17 मार्च रोजी सकाळी उघडकीस आला. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.