Pimpri corona Update : भोसरी, गवळीनगर, चऱ्होली, दिघी भागात कोरोनाचे सर्वाधिक 1893 सक्रिय रुग्ण

'इ' आणि 'ब' क्षेत्रीय हद्द कोरोना हॉटस्पॉट; आपल्या भागात किती ॲक्टीव्ह रुग्ण ?

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ सुरूच आहे. पालिकेच्या ‘इ’ क्षेत्रीय प्रभाग कार्यालयाच्या हद्दीतील भोसरी, गवळीनगर, चऱ्होली, दिघी या भागात कोरोनाचे सर्वाधिक 1893 सक्रिय रुग्ण आहेत. त्याखालोखाल ‘ब’ प्रभागाच्या रावेत, किवळे-विकासनगर, बिजलीनगर, चिंचवडेनगर, चिंचवड हद्दीत कोरोनाचे 1668 रुग्ण आहेत. हे दोनही प्रभाग कोरोना हॉटस्पॉट आहे.

महापालिकेने शुक्रवारी (दि.18) रात्री दिलेल्या नकाशानुसारची ही आकडेवारी आहे. शहरातील 9 हजार 394 सक्रिय रुग्णांवर पालिका रुग्णालय, सीसीसी सेंटरमध्ये उपचार सुरु आहेत. काही रुग्णांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

दरम्यान, शहरातील रुग्णसंख्या 70 हजाराच्या उंबरठ्यावर आहे. शहरात 10 मार्च रोजी कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला होता. तेव्हापासून शहरातील 68 हजार 439 जणांना आतापर्यंत कोरोनाची लागण झाली आहे. त्यापैकी 54 हजार 225 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. शहरातील 1109 जणांचा तर शहराबाहेरील परंतू महापालिका रूग्णालयात उपचार घेणार्‍या 335 अशा 1444 जणांचा आजपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

महापालिकेकडून शहरात कोरोनाचे किती सक्रिय रुग्ण आहेत. त्याबाबतची सविस्तर माहिती असलेला क्षेत्रीय कार्यालनिहाय नकाशा दररोज प्रसिद्ध केला जातो.

शुक्रवारी रात्री प्रसिध्द केलेल्या नकाशानुसार ‘इ’ क्षेत्रीय प्रभाग कार्यालयाच्या हद्दीतील भोसरी, गवळीनगर, चऱ्होली, दिघी या भागात कोरोनाचे सर्वाधिक 1893 सक्रिय रुग्ण आहेत.

क्षेत्रीय कार्यालयानिहाय सक्रिय रुग्ण संख्या !

‘अ’ – क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत येत असलेल्या संभाजीनगर, मोहननगर, आनंदनगर, चिंचवडस्टेशन, आकुर्डी, प्राधिकरण, आनंदनगर, भाटनगर भागात 1479 सक्रिय रुग्ण आहेत.

‘ब’ – क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत येत असलेल्या रावेत, किवळे-विकासनगर, बिजलीनगर, चिंचवडेनगर, चिंचवड प्रभागात 1668 सक्रिय रुग्ण आहेत.

‘क’ – क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत येत असलेल्या नेहरूनगर, खराळवाडी, अजमेरा, बोऱ्हाडेवाडी, धावडेवस्ती, इंद्रायणीनगर भागात सर्वात कमी म्हणजेच कोरोनाचे 619 रुग्ण आहेत.

‘ड’ – क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत येत असलेल्या वाकड, पिंपळेनिलख, पिंपळेसौदागर, पिंपळेगुरव भागात कोरोनाचे 625 सक्रिय रुग्ण आहेत.

‘इ’ – क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत येत असलेल्या भोसरी, गवळीनगर, चऱ्होली, दिघी भागात कोरोनाचे सर्वाधिक 1893 रुग्ण आहेत. च-होली, दिघी भागातील रुग्णांची संख्या जास्त आहे. प्रभागातील रुग्णसंख्या तीन हजाराच्या पुढे गेली होती. आता नियंत्रणात येत आहे.

‘फ’ – क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत येत असलेल्या चिखली, कृष्णानगर, तळवडे-रुपीनगर, यमुनागनर, निगडी गावठाण, सेक्टर क्रमांक 22 या प्रभागात कोरोनाचे 1211 रुग्ण आहेत.

‘ग’ – क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत येत असलेल्या पिंपरीगाव, थेरगाव, गणेशनगर, रहाटणी भागात कोरोनाचे 1043 सक्रिय रुग्ण आहेत.

‘ह’ – क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत येत असलेल्या संत तुकारामनगर, महात्माफुलेनगर, दापोडी, फुगेवाडी, कासारवाडी, नवी सांगवी, सांगवी भागात कोरोनाचे 856 सक्रिय रुग्ण आहेत. सक्रिय रुग्णांवर कोविड केअर सेंटर, महापालिका, खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.