Pimpri: युवकांना सर्वाधिक कोरोनाचा विळखा; आजपर्यंत 80 युवकांना लागण

 कोणत्या वयोगटातील कितीजणांना कोरोनाची बाधा ?

एमपीसी न्यूज – कोरोनाने युवकांना विळखा घातला आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील  80 युवकांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली आहे.  कोरोनाची लागण होण्याचे सर्वाधिक प्रमाण युवकांना आहे. त्याखालोखाल 40 वर्षापुढील 41 जणांना, 13 वर्षापुढील 30 तर 24 लहान मुलांना आणि 60 वर्षापुढील 20 वृद्धांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली आहे.

दरम्यान, रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही चांगले असून आजपर्यंत 119 जण कोरोनामुक्त झाले आहेत.

पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाचा कहर सुरु आहे. शहरातील 195 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर, शहराबाहेरील 25 अशा 220 जणांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनाची लागण होण्याचे प्रमाण सर्वाधिक युवकांमध्ये आहे.

119 जणांनी आत्तापर्यंत कोरोनावर यशस्वी मात केली आहे. तर,  पुण्यातील पण महापालिका रुग्णालयात उपचार घेत असलेल्या आठ आणि शहरातील चार अशा 12 जणांचा कोरोनाने आजपर्यंत बळी घेतला आहे.

कोणत्या वयोगटातील कितीजणांना कोरोनाची बाधा ?

22 ते 39 वय वर्ष असलेल्या शहरातील 80 युवकांना कोरोनाची आत्तापर्यंत लागण झाली आहे. हे प्रमाण सर्वाधिक आहे. त्याखालोखाल 40 ते 59 वय वर्ष असलेल्यांना लागण होण्याचे प्रमाण आहे. या वयोगटातील 41 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यानंतर 13 ते 21 वयवर्ष असलेल्या 30 तरुणांना कोरोनाची लागण झाली आहे.

तर, 0 ते 12 वयवर्ष असलेल्या 24 लहान मुलांना कोरोनाची बाधा झाली आहे. याशिवाय 60 वर्षापुढील 20 वृद्धांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.