Pimpri : ज्येष्ठ मातांनी सुनेला उद्याची माता या नात्याने सन्मानित करावे – डॉ. वृषाली किन्हाळकर

एमपीसी न्यूज – स्त्रियांनीच मुलींचा आदर करायला हवा. ज्येष्ठ मातांनी सुनेला उद्याची माता या नात्याने सन्मानित केल्यास हा मातृदिन ख-या अर्थाने साजरा होईलस असे मत डॉ. वृषाली किन्हाळकर यांनी चिचवड येथे व्यक्त केले.

जागतिक मातृदिनाच्या निमित्ताने फेस्कॉम, अॅस्कॉप, जेरिथॅट्रिक वेलनेस फाऊंडेशन, लोकमान्य हॉस्पिटल व विवेक व्यासपीठ यांच्या वतीने शुक्रवारी (दि. 10) ज्येष्ठ माता गौरव सोहळा 2019 चे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी त्या मातृत्व, मातेचा आत्मसन्मान या विषयावर बोलत होत्या.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी फेस्कॉमच्या महिला प्रमुख डॉ. माया कुलकर्णी होत्या. श्रीमती अंजली देशपांडे, मंदा नाईक, अनुराधा फातरफोडस, कुसुम घुमटकर, द्रौपदी खरात आदी ज्येष्ठ मातांचा सन्मान करण्यात आला. ही निवड विद्यापीठाच्या बहि:शाल विभागाचे प्रमुख डॉ. नवनाथ तुपे, डॉ. तेज निवळीकर, डॉ. आऱ. टी. वसरकर यांनी केली.

ज्येष्ठ नागरिकांना भेडसावणा-या सांधेदुखी या समस्येतील आधुनिक उपचारांची माहिती लोकमान्य हॉस्पिटलचे डॉ. सतीश काळे यांनी दिली. महिलांचे मासिक पाळीनंतरचे आरोग्य या विषयी स्त्रीरोग तज्ञ डॉ. प्रिती काळे, ब्रेस्ट कॅन्सर यावर डॉ. माया कुलकर्णी यांचे आरोग्यविषयक माहितीपूर्ण व्याख्याने झाली. ज्येष्ठ पोलीस निरीक्षक राधिका फडके यांनी सुरक्षितता यांचे धडे दिले.

वयाची सत्तरी उलटलेल्या ज्येष्ठ महिलांनी भारुड, गोंधळ, देशभक्तीपर गाणी, कव्वाली, मुजरा पासून काटा लगा सारख्या गाण्यांवर झुंम्बा नृत्य करुन कार्यक्रमातील उत्साह व रंगत वाढविली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अरुण रोडे यांनी केले. डॉ. श्रीकृष्ण जोशी यांनी कार्यक्रमाची संकल्पना विषद केली. सुनंदा काळे, माधुरी पवार, सुनंदा एडके यांनी सूत्रसंचालन केले. मालती डुंबरे यांनी आभार मानले. चंद्रकात महामुनी यांनी संयोजन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.