Pimpri : मोरवाडी आय.टी.आयमध्ये टोयोटा मार्फत करिअर डे च्या प्रशिक्षणार्थींची निवड

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या आय.टी.आय. मोरवाडीमध्ये मेकॅनिकल मोटार व्हाईकल करिता टोयाटो टेक्निकल एज्युकेशन प्रोग्रेम अंतर्गत करिअर डे च्या प्रशिक्षणार्थींची निवड करण्यात आली.

आय.टी.आय. मोरवाडी आणि टोयाटो टेक्निकल एज्युकेशन यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला. दरवर्षी टोयोटा यांच्यावतीने करिअर डेचे आयोजन करुन रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्यात येतात. संस्थेतील प्रशिक्षणार्थ्यांकरिता शरयू टोयोटा ताथवडे, शरयू टोयोटा भोसरी, शरयू टोयोटा बारामती, शो टोयोटा वाघोली, के. कोठारी टोयोटा पुणे, चौधरी टोयोटा जळगाव, शरयू टोयोटा कोल्हापूर यांच्यामार्फत जनरल सर्व्हिस टेक्निशिनय पदाकरिता 26 प्रशिक्षणार्थीपैकी 25 प्रशिक्षणार्थ्यांची निवड केली.

करिअर डेचे नियोजन वेस्टर्न ट्रेनिंग हेडचे प्रदीप गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. यावेळी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य शशिकांत पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. गटनिदेशक विजय आगम, सुनील मोरे यांनी मनोगत व्यक्त केले. संतोष पाटील यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.