Pimpri : खासदार बारणे यांचा वैयक्तिक भेटीगाठीवर भर

एमपीसी न्यूज – लोकसभा निवडणुकांच्या प्रचाराची रणधुमाळी सुरु आहे. यामध्ये सभा, बैठका, चर्चा आणि भेटीगाठींचा जोर सुरु आहे. प्रभागस्तरावर नियोजन करून प्रचार सुरु आहे. त्यातच भाजप-रिपइं-रासप-रयत क्रांती संघटना महायुतीचे उमेदवार, खासदार श्रीरंग बारणे यांनी प्रचारात वैयक्तिक भेटीगाठीवर भर दिला आहे. गुरुवारी (दि. ११) त्यांनी हिंजवडी, विनोदेवस्ती आणि परिसरातील प्रमुख कार्यकर्त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली.

हभप कन्हैयालाल भूमकर, नितीन विनोदे, श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखाना संचालक बाळासाहेब विनोदे, मोहन विनोदे, शांताराम विनोदे, हभप जालिंदर भाऊसाहेब अल्हाट, ज्ञानोबा विनोदे, राजाभाऊ भुजबळ आदींच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. यावेळी नेताजी विनोदे, मनोज विनोदे, भरत विनोदे, वसंत भुजबळ, अशोक भुजबळ, संजय भुजबळ, कैलास भुजबळ, अनिल भुजबळ, अमित भुजबळ, गणेश पारखी आदी उपस्थित होते.

महायुतीच्या मित्र पक्षांच्या माध्यमातून मावळ लोकसभा मतदारसंघात ठिकठिकाणी प्रचार सभा आणि बैठकांचे आयोजन करण्यात येत आहे. सर्व तालुकास्तरावर आमदार आणि प्रमुख कार्यकर्त्यांनी नियोजनात पुढाकार घेतला आहे. सभा आणि बैठकिंसोबत व्यक्तिगत गाठीभेटींवर देखील खासदार बारणे यांनी भर दिला आहे. गुरुवारी त्यांनी हिंजवडी, विनोदे वस्ती आणि परिसरातील प्रमुख कार्यकर्त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली. यामुळे प्रमुख कार्यकर्ते प्रचारात सक्रीय होत आहेत. ठिकठिकाणी बारणे यांचे औक्षण करून स्वागत करण्यात येत आहे. त्याचबरोबर येत्या लोकसभा निवडणुकीत महायुतीचा विजय होणार असल्याची जोरदार चर्चा सुरु आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.